
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
महसूल (Revenue) खात्यातील नायब तहसीलदार हे पद वर्ग -२ चे आहे ; मात्र त्यानुसार वेतनश्रेणी दिली जात नसून राज्य शासनाकडून अन्याय केला जात आहे. वर्ग-२ ची वेतश्रेणी पुढील दोन महिन्यांत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या (Maharashtra State Tehsildar and Naib Tehsildar Association) नाशिक येथील बैठकीत घेण्यात आला.
गुरुवारी (दि.२३) महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेची बैठक झाली. बैठकीत वेतश्रेणीचा मुद्दा हा १९९८ पासून प्रलंबित आहे. त्यासाठी आपण नित्याने पाठपुरावा करत असतानाही शासन दुर्लक्ष करत आहे असा सूर निघाला.
सातव्या वेतन आयोगावेळी (Seventh Pay Commission) त्याचे सादरीकरणही संघटनेने आयोगाकडे केले होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. विशेष म्हणजे सध्या ४३०० ग्रेडपे दिला जात असून मागणी केवळ ४८०० म्हणजे ५०० रुपये फरकाची आहे. तसेच ४ वर्षापासून नायब तहसीलदार आणि तहसीलदारांच्या पदोन्नत्याही रखडल्या आहेत अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
त्यामुळे संघनेच्या सदस्यांच्या भावाना तीव्र असून, शासन दखल घेत नसल्याने आता पुढील २-३ दिवसांत महसूल मंत्र्यांना निवेदन दिले जाणार असून, त्यानंतरही मागणी पुर्ण न झाल्यास मात्र तीव्र आंदोलन एप्रिल-२०२३ पासून सुरु केले जाणार असल्याचा एकमुखी निर्णय बैठकित घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे (Suresh Bagle) यांनी दिली. बैठकिला राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी असे २०० सदस्य उपस्थितीत होते.