...अन्यथा नाशिकमध्येही औरंगाबाद पॅटर्न - पालकमंत्री भुजबळ

...अन्यथा नाशिकमध्येही औरंगाबाद पॅटर्न - पालकमंत्री भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना Corona नियंत्रणात येत असला तरी लसीकरणाचे Vaccination प्रमाण अजुन कमी आहे. ते न वाढविल्यास औरंगाबाद पॅटर्न Aurangabad Pattern प्रमाणे नाशिक मध्येही लस न घेणार्‍याना सरकारी सवलीत बंदची अंमलबजणी करावी लागेल. असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Bhujbal यांनी दिला.

दर आठवड्यानुसार भुजबळ यांनी करोना आढवा बैठक घेतली. त्यानंंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले. अजुन 53 लाख लसी जोेपर्यंत दिल्या जात नाही. तोपर्यंत करोनाचे संकट दुर होणार नाही. म्हणुुनच याची गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. सध्या औरंंगाबादच्या जिल्हाधिकार्‍यांंनी लस न घेणार्‍यवर जसे निर्बध लादण्यास सुरवात केली व त्याची चर्चा मंत्रीमंंडळातही झाली. अशीच कडक पाऊले उचलावी लागतील अशी कटु वेळ नाशिककरांनी कृपया येऊ देऊ नये. अन्यथा नाईलाजास्तव त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल.

अजुन दहा पंधरा दिवस आम्ही वाट पाहु. त्यानंंंतर निर्णय घेतला जाईल. औरंगाबाद जिल्हाधिकार्‍यांंचा निर्णय जनतेच्या फायद्यासाठीच आहे, असे ते म्हणाले. सध्या मालेगावला सर्वात कमी लसीकरण आहे. त्यावर भजुबळ म्हणाले की, मालेगावात का कमी लसीकरण झाले हे आम्ही बघू. गेल्या वेळी मौलवी आणि इतरांशीही चर्चा झाली होती. आता पुन्हा लक्ष घालावे लागेल. ही चचा सुरु असतांंना मालेगावला दंगल उसळल्याची बातमी आली. त्यावर भुुजबळ म्हणाले की कोणी काहीही बरळत असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नये.

गेल्या दोन वर्ष करोनानंंतर आता कुठे आनंंदी वातावरण दिसत आहे. त्यामुळे कृपया डोके गरम करून घेऊ नका, शांंतता राखा पोलिस त्यांचे काम करतील आपल्या कृतीमुळे कुठल्याही संकटात वाढ होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी असे ते म्हणालेे. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ पोलिस आयुक्त दीपक पांंडेय, पोलिस अधीक्षक सचीन पाटील, निवासी उपिल्हाधीकारी भागवत डोईफोडे, वासंता माळी उपस्थीत होते.

येणार्‍या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह 600 मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार आहे. तसेच लसीकरणासाठी कठोर उपाययोजना करण्याची इच्छा नाही. परंतु जनतेने सहकार्य न केल्यास तशी पावले उचलावी लागतील. त्यामुळे जनतेने स्वत:हुन पुढाकार घेण्यासह प्रशासनाने ही मोहीम घरोघरी पोहोचवावी असे आवाहन भुजबळ यांनी केले.

सण, उत्सवांच्या कालावधीनंतरची कमी होणारी करोनाची आकडेवारी चांगले संकेत देणारी व करोनामुक्तीसाठी आशादायक चित्र निर्माण करणारी आहे. अर्थात यांत जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणीकरण होत असलेले लसीकरणाचा मोठा वाटा आहे. येणार्‍या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणाला गती देण्यासाठी औरंगाबादसारख्या कुठल्याही कठोर उपाययोजना राबवण्याची शासन प्रशासनाची इच्छा नसून मात्र जनतेने सहकार्य न केल्यास नाईलाजास्तव त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यासाठी जनतेने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com