कुर्णोली येथील अनाथ मुलांना मिळाला आधार

राष्ट्रवादीच्या अभिनव उपक्रमास सुरवात
कुर्णोली येथील अनाथ मुलांना मिळाला आधार

जानोरी | Janori

जिल्ह्यात करोना काळात (District Corona Crisis) करोनामुळे आई वडील गमावून अनाथ (Orphans Children) झालेल्या बालकांना दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka ) राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (National Youth Congress Nashik) आधार दिला आहे.

कुर्णोली येथील नामदेव मधुकर संधान व सुनंदा नामदेव संधान या दाम्पत्याचा करोनाने मागील मे महिन्यात निधन (Death Of Corona) झाले. त्यांच्या पश्चात कावेरी व कृष्णा नामक हे दोन मुले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच शिक्षणाचा प्रश्न समोर उभा राहिलेला होता.

याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग( Purushottam Kadla) यांना माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील करोना काळात आई-वडील गमावलेल्या अनाथ बालकांना आधार देण्याचे ठरवले. त्याची सुरुवात दिंडोरी तालुक्यातील कुर्णोली येथील संधान कुटुंबापासून करण्यात आली.

कावेरी व कृष्णा या दोघांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सपकाळ फाउंडेशनचे रविंद्र सपकाळ (Ravindra Sapkal) यांनी उचलला असून कसमादे प्रोड्युसर अॅग्रोचे संचालक गणेश पवार( Ganesh Pawar) यांच्यावतीने २५००० रूपयांचा धनादेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ योगेश गोसावी (Dr Yogesh Gosavi) यांच्यावतीने निराधार झालेल्या कावेरी व कृष्णा संधान यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यात आली.

करोनाकाळात आई वडील गमावलेल्या मुलांना शैक्षणिक आधार देण्याचा पक्षाच्या वतीने घेण्यात आला असून याची सुरुवात कुर्णोली येथील संधान कुटुंबातील मुलांना दत्तक घेवून केली आहे. जिल्ह्यातील उर्वरित मुलांचा शोध घेत त्यांनाही आवश्यक मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू.

- पुरूषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

करोनाच्या महामारीत अनाथ झालेल्या मुलांना आधार देण्याचा अभिनव उपक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आला असून याचे स्वागत करतोच तसेच कुर्णोली येथील संधान कुटुंबातील कावेरी नामदेव संधान व कृष्णा नामदेव संधान या दोन्ही मुलांची पुढील आरोग्याची जबाबदारी राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्यावतीने घेण्यात येईल.

- डॉ योगेश गोसावी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी डॉक्टर सेल

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com