अनाथ बालकांची राष्ट्रवादीकडून दखल

अनाथ बालकांची राष्ट्रवादीकडून दखल

निफाड । प्रतिनिधी Niphad

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) जीवलग अभियानाअंतर्गत अनाथ मुलांची दखल घेत( Care of orphans under Jeevalag Abhiyan ) पदाधिकार्‍यांनी त्यांची अस्थावाईकपणे चौकशी केली. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र भवर, राष्ट्रवादी युवक निफाडचे अध्यक्ष भूषण शिंदे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख प्रफुल्ल पवार, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष शरद शिंदे, सरपंच विजय डांगले आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून नांदूरमध्यमेश्वर येथील हिरे कुटुंबाला सरकारी पातळीवरील सर्व मदत पोहोचवण्याच त्यांनीे आश्वासन दिले.

नांदूरमध्यमेश्वर येथील केदू हिरामण हिरे यांचे 9 एप्रिल रोजी तर त्यांची पत्नी जयश्री केदू हिरे यांचे 10 एप्रिल रोजी करोनामुळे निधन झाले.

परिणामी त्यांची मुले गौरव केदू हिरे (17,), ज्योती केदू हिरे (18, ), स्वाती केदू हिरे (20,) त्यांच्यासह विवाहित मुली मोनिका दीपक रोकडे, वैशाली अविनाश साळवे (रा. दिघवद, ता. चांदवड). यांची मामा सोपान भगत पगारे यांच्या मळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेतली.

तसेच खा. सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधत माहिती दिली. घेऊन या प्रत्येक अनाथ मुलाची आस्तेवाईकपणे चौकशी करून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. शरद शिंदे यांनीही वह्या, पुस्तके देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी रामदास शिंदे, शांताराम दाते, रमेश माळी, प्रकाश माळी, दीपक इकडे, गोरख कांदळकर, माणिक शिंदे, कैलास शिंदे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com