पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नवीन नाशिक |प्रर्तीनिधी New Nashik

महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन फोरम नाशिकच्या (Maharani Ahilya Devi Holkar Education Forum, Nashik) वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती ( Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti )निमित्त पवन नगर स्टेडियम नवीन नाशिक येथे भव्य शोभा यात्रा व प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची आल्याची माहिती नवीन नाशिक समिती अध्यक्ष किरण थोरात यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त फोरमचे महाराष्ट्र अध्यक्ष विजय हाके,गंगाधर बिडगर,धनंजय माने,बापूसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली (दि. ३०) सायंकाळी ५ वाजता रामकुंड पंचवटी येथे गोदा आरती आणि दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ( दि.३१) दुपारू ०३:३० वाजता पवन नगर स्टेडियम येथून शोभा यात्रेची सुरवात करण्यात येणार असून रायगड चौक,दिव्या अ‍ॅ‍ॅडलॅब, जीएसटी भवन मार्गे पुन्हा पवन नगर स्टेडियम येथे शोभा यात्रेचा समारोप होईल.

सायंकाळी आठ वाजता राजमातेचे महाआरती करण्यात येणार व त्यानंतर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार,पालकमंत्री छगन भुजबळ,खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत. तरी याप्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नवीन नाशिक समिती अध्यक्ष किरण थोरात,उपाध्यक्ष निलेश हाके,सचिव प्रल्हाद केसकर,खजिनदार राजेंद्र शिंदे,कार्याध्यक्ष हर्षद बुचुडे सह कार्याध्यक्ष दत्तात्रय चिखले,चिटणीस सुशीलकुमार ठाकरे,प्रदीप हटकर,सहखजिनदार योगेश सरोदे नवनाथ शिंदे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com