स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वर्षभर उपक्रम

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वर्षभर उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) Swachh Bharat Missionअंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर Zilla Parishad President Balasaheb Kshirsagar, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.

नाशिक जिल्हा मार्च 2018 मध्ये हागणदारी मुक्त घोषित झाला असून पायाभूत सर्वेक्षणानुसार कुटुंबांकडे शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत शौचालयांचा नियमित वापर व्हावा, नादुरुस्त शौचालय दुरुस्त व्हावीत, गावातील व परिसराची स्वच्छता राहावी यासाठी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासह शाश्वत स्वच्छतेवर काम करण्यात येत आहे. याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात 1 सप्टेंबर 2021 ते 15 ऑगस्ट 2022 यादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सत्याग्रह से स्वच्छाग्रह अंतर्गत गावाचा हागणदारी मुक्त ग्रामपंचायतींचा दर्जा कायम ठेवून त्यात सातत्य राखण्याच्या दृष्टीने हागणदारी मुक्त अधिक ओडीएफ प्लस हा उपक्रम राबून 15 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्ह्यातील जास्तित जास्त ग्रामपंचायती टप्याटप्याने हागणदारीमुक्त घोषित करावयाच्या आहेत. स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत गाव व परिसरातील स्वच्छतेसाठी ग्रामस्थांमार्फत श्रमदाना द्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून स्वच्छते विषयी ग्रामस्तरावर उत्कृष्ट काम करणार्‍या स्वच्छाग्रहींना गौरविण्यात येणार आहे. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे.

स्थायित्व सुजलाम या शंभर दिवसांचे उपक्रम अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शोष खड्डे खोदकाम व बांधकाम ,नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, शौचालय उपलब्ध नसणार्‍या कुटुंबांना शौचालय उपलब्धी हे उपक्रम राबविण्यात येणार आहे. नवा संकल्प या उपक्रमा अंतर्गत कुटुंब स्तरावर कचरा विलगीकरण, शोष खड्डा व सेफ्टी टँक रिकामे करणे, प्लास्टिक वस्तूंचा वापर न करणे याबाबत सर्व ग्रामपंचायतींमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर रोजी संकल्प करण्यात येऊन याबाबत शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच तसेच विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

शाश्वत स्वच्छतेसाठी वर्षभर चालणार्‍या या उपक्रमांमध्ये करोना नियमांचे पालन करुन लोकसहभागातून स्वच्छतेविषयक राबविण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com