झिरवाळांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

झिरवाळांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष (Maharashtra State Assembly Deputy Speaker) तथा दिंडोरी (dindori) - पेठ (Peth) विधानसभा मतदार संघाचे आमदार नरहरी झिरवाळ (MLA Narhari Jirwal) यांच्या वाढदिवसानिमित्त दिंडोरी व पेठ तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital) व पॅनासिया हॉस्पिटल नाशिक (Panasia Hospital Nashik) यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर (Health camp) वणी (vani) येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी हद्यरोग, मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (High blood pressure), बी.एम. आय., वंध्यत्व निरावण, स्त्रीरोग आदी रोगांवर निवारण करण्यात येणार आहे. पेठ येथील नगरपंचायत कार्यालयासमोर जुने तहसील कार्यालयात येथे एक हजार महिलांना संसार उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे.

दिड हजार महिलांना छत्री वाटप करण्यात येणार आहे. बचत गटांतील महिलांना लकी ड्रा (Lucky draw) व्दारे 105 संसार उपयोगी वस्तू देण्यात येणार आहे. नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवित असतात. याही वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी दिंडोरी - पेठ तालुक्यातील जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com