शेतकर्‍यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

शेतकर्‍यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

नाशिक। प्रतिनिधी Nashik

द्राक्ष समुह फळपीक विकास कार्यक्रम अंतर्गत एनएचआरडीएफ चितेगाव फाटा, निफाड ( Niphad ) येथे 28 जूनला सकाळी 10.00 वाजता शेतकरी प्रशिक्षण (Farmer training)वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक ( Grapes Growers ) प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, त्यांचे महासंघ, भागीदारी संस्था, मालकी संस्था व कंपन्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

भारत सरकारच्या कृषी शेतकरी कल्याण मंत्रालयाने देशातून 53 फलोत्पादन समूह निवडले आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्याची द्राक्ष समुह फळपिक विकास कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. या क्लस्टरची क्षेत्र मर्यादा 15 हजार हेक्टर इतकी आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हा निर्यात बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढविणे, एकात्मिक पद्धतीने लॉजिस्टिक्स, मार्केटिंग आणि ब्रँडिंगमध्ये पूर्व उत्पादन, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि मुल्यवर्धन याद्वारे मुल्य साखळीच्या अडचणी दूर करणे यासोबतच उत्पादनाच्या काढणीनंतर हाताळणी, मुल्यवर्धन आणि बाजार जोडणी याकरीता पायभूत सुविधांचा विकास करणे असा आहे.

या प्रकल्पाचे पुर्व उत्पादन, काढणीनंतरचे व्यवस्थापन व मुल्यवर्धन व लॉजिस्टिक मार्केटिंग आणि ब्रँडिंग अशा तीन समावेशक घटकांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय बागवानी यांच्यामार्फत आर्थिक सहाय्य आणि देखरेख करण्यात येणार आहे. संचालक महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे यांना क्लस्टर डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नामांकन देण्यात आले आहे.

फळपीक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी क्लस्टरच्या विविध घटकांसाठी खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी एजन्सीची Call for Proposal द्वारे निवड केली जाणार आहे. प्राप्त Call for Proposal चे मुल्यांकन राज्यस्तरावर मुल्यांकन समितीद्वारे करण्यात येणार आहे. अंमलबजावणी एजन्सीची अंतिम निवड छकइ स्तरावरील मान्यता समितीद्वारे करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com