राज्यव्यापी कर परिषदेचे आयोजन

तब्बल 15 वर्षांनी नाशकात आयोजन
राज्यव्यापी कर परिषदेचे आयोजन

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

नाशिक येथील नॉर्थ महाराष्ट्र कर सल्लागार संघटना (North Maharashtra Tax Advisory Association )यांच्या पुढाकाराने, राज्यातील जीएसटीपी असोसिसिएशन ऑफ महाराष्ट्र, नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि पुणे येथील महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन,यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २३ आणि २४ एप्रिल रोजी हॉटेल एक्स्प्रेस इन येथे १५ वर्षांनंतर राज्यव्यापी कर परिषदेचे आयोजन (Organizing Statewide Tax Council ) करण्यात आले असल्याची माहिती नॉर्थ महाराष्ट्र कर सल्लागारसंघटनेचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील नाशिक, अहमदनगर,धुळे, जळगाव,नंदुरबार, पुणे,मुंबई,परभणी, सातारा,कऱ्हाड, सांगली,नांदेड,आदी जिल्हा स्तरावरून, सुमारे २५० ते ३०० कर सल्लागार,सीए, तसेच टॅक्स एडव्होकेट्स या कॉन्फरन्स साठी उपस्थित राहणार आहेत.

कर कायद्यामधील जीएसटी,आयकर या विषयांशी संबंधित, कायद्यामधील झालेले नवनवीन बदल,तरतुदी आदीबाबत त्या त्या क्षेत्रातील नामवंत तज्ञ व्याख्याते या परिषदेमध्ये माहिती देणार आहेत. दि. २३ रोजी सकाळी ९ .३० वा.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच केंद्रीय जीएसटी आयुक्त अविनाश थेटे व राज्य जीएसटी आयुक्त सुभाष येंगडे,एसकेडी कन्सल्टंट प्रा.लि.चे संचालक संजय देवरे यांच्या हस्ते होणार असून कॉन्फरन्स साठीची नोंदणी पूर्ण झाली आहे.

राज्यातून येणाऱ्या करसल्लागारांना या कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या चर्चासत्रे, व्याख्यानातून मोठा लाभ मिळणार आहे. या राज्यव्यापी कर परिषदेच्या आयोजनात नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन सोबत राज्यातल्या मोठ्या कर सल्लागार संघटना, दी गुडस अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, तसेच पुणे येथील महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांचा सहभाग आहे.

यावेळी आलोक मेहता (मुंबई),मनोज चितळीकर (पुणे), एन. बी.मोरे (नाशिक),निवृत्ती मोरे,सुनील देशमुख,रंजन चव्हाण,जयप्रकाश गिरासे,प्रकाश विसपुते, अक्षय सोनजे, योगेश कातकडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.