राज्यस्तरीय नवउद्योजक स्पर्धेचे आयोजन

तुलना ही दुसर्‍याशी नव्हे तर स्वतःची करा : डॉ. पापनेजा
राज्यस्तरीय नवउद्योजक स्पर्धेचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नव्या जगात स्टार्टअप ( Start Up )खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याजवळील नवनवीन कल्पना (New ideas ) समूहांमध्ये सांगून त्या विकसित करता येऊ शकतात, नेहमी तुलना ही दुसर्‍याशी नव्हे तर स्वतःची करा, असे मत अमेरिकेच्या झेंद्री लॅबचे डॉ. राजीव पापनेजा ( Dr Rajiv Papneja )यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule University of Pune )विद्यार्थी विकास मंडळ (Student Development Board ) आणि केटीएचएम कॉलेज ( KTHM College )यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय नवउद्योजक स्पर्धेचे आयोजन (State Level New Entrepreneur Competition ) करण्यात आले होते. त्या स्पर्धच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेसाठी नाशिकसह नगर व पुणे जिल्ह्यातून 50 संघांच्या माध्यमातून 120 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

नवउद्योजक व व्यवसाय योजना अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, अमेरिकेच्या झेंद्री लॅबचे डॉ. राजीव पापनेजा, ‘केटीएचएम’चे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांसह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.या स्पर्धेत सहभागी संघांनी त्यांच्या कल्पनांआधारे उद्योजकता तसेच उफाडे यांनी काम पाहिले.

व्यवसाय योजनेचे प्रकल्प मांडले होते. परीक्षक म्हणून फाउंडर्स लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी परिमल मोदी, यू. व्ही. फाउंडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी युवराज वडजे, डॉ. अमोल रहाणे, डॉ. अनिरुद्ध भगत, डॉ. डी. बी. उफाडे यांनी काम पाहिले. नवनिर्मिती, उद्योगशीलतेचा ध्यास असेल तर विद्यापीठ सर्वतोपरी मदत करेल. विद्यार्थ्यांनी आता नोकरी मागणारे नव्हे, तर रोजगार देणारे होण्याचा सल्ला डॉ. परचुरे यांनी विद्यार्थ्यांंना दिला.

नव्या जगात स्टार्टअप खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या-जवळील नवनवीन कल्पना समूहांमध्ये सांगून त्या विकसित करता येऊ शकतात, असे मत डॉ. पापनेजा यांनी व्यक्त केले. नवनिर्मिती, उद्योगशीलतेचा ध्यास असेल तर विद्यापीठ सर्वतोपरी मदत करेल. विद्यार्थ्यांनी आता नोकरी मागणारे नव्हे, तर रोजगार देणारे होण्याचा सल्ला डॉ. परचुरे यांनी विद्यार्थ्यांंना दिला.

हे ठरले विजेते

नवउद्योजक स्पर्धेत अशोका सेंटर फॉर बिझनेस अँड कॉम्प्युटर सायन्सने (पाच हजार रुपये) पहिले पारितोषिक पटकावले. केटीएचएम कॉलेजने (तीन हजार रुपये)द्वितीय, प्रवरा रूरल कॉलेजने (दोन हजार रुपये) तृतीय, तर स्वामी षटकोपाचार्याजी महाराज महाविद्यालयाने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. व्यवसाय योजना स्पर्धेत एसएनजेबी कॉलेजने (तीन हजार रुपये) प्रथम, केटीएचएम कॉलेजने (दोन हजार रुपये) द्वितीय, मॉडर्न फार्मसी कॉलेजने (एक हजार रुपये) तृतीय, तर मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com