गडावर 'सप्तशृंगी हिल मॅरेथॉन'चे आयोजन

गडावर 'सप्तशृंगी हिल मॅरेथॉन'चे आयोजन

नांदुरी । वार्ताहर Nanduri

श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट (Shree Saptasringi Niwasini Devi Trust) व नाशिक रनर्स ( Nashik Runners )आयोजित 'सप्तशृंगी हिल मॅरेथॉन 2022' ( 'Saptashringi Hill Marathon 2022')सहावे पर्व रविवार दि. 16 ऑक्टोंबर रोजी होणार असल्याची माहिती श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ.प्रशांत देवरे आणि नाशिक रनर्सचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी दिली.

गडावरील आरोग्यदायी वातावरणाचा अनुभव सर्वांना घेता यावा या उद्देशाने नाशिक शहरातील मनाशिक रनर्सफ या ग्रुपने मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.

ही स्पर्धा 21 कि.मी. स्त्री/पुरुष, 10 कि.मी. स्त्री/पुरुष व 5 कि.मी. स्फुत रन स्त्री/पुरुष अश्या प्रकारात होणार आहे.शिवाय ही मॅरेथॉन ग्रामीण भागात भरवली जाणार असल्याने या निमित्ताने ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनाही आपले कौशल्य दाखविण्याची संधी देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन ही एक आगळीवेगळी मॅरेथॉन असून जास्तीतजास्त संख्येने लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक रनर्सचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी केले आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी ऑफलाइन करता येणार आहे. या स्पर्धेसाठी नाशिकमधील सर्व आर्यनमैन उपस्थित राहणार आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने नांदुरी ते सप्तश्रृंगी गड ही वाहतूक सेवा सकाळी 6 ते 9:30 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मॅरेथॉनचे स्वरूप

गडाचा पायथा नांदुरी गाव येथून स्पर्धेला सुरुवात

21 किमी साठी नांदुरीगाव ते शिवालय तिर्थ आणि पुन्हा परत तसेच 10 किमी साठी मंकी पॉईंट व परत असा मार्ग

स्पर्धेचे अंतर 21 किमी व दहा किमी

हौशी धावपटूंसाठी 05 किमी अंतराचे डिव्हाइन रन

शर्यतप्रसंगी गडावर जाणारा मार्ग वाहतुकीसाठी सकाळी सहा ते साडे नऊ वाजेदरम्यान बंद असणार

धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी आदिवासी लोकनृत्ये आणि नाशिक ढोलचे आयोजन

स्पर्धकांची आरोग्यविषयक सुरक्षा म्हणून जागोजागी रुग्णवाहिकांसह डॉक्टरांची टीम उपलब्ध

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com