संबळ महोत्सवाचे आयोजन

संबळ महोत्सवाचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी

प्राचार्य नानासाहेब मोरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या (Principal Nanasaheb More of a multi-purpose charitable organization )वतीने रविवारी (दि. 15) परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे संबळ महोत्सवाचे ( sambal Mahotsav ) आयोजन करण्यात आले आहे.

कलावंतांमध्ये आणि संबळ कलेमध्ये नवचैतन्य जागृत करण्यासाठी होणार्‍या या उपक्रमामध्ये नाशिक जिल्ह्यातील संबळवादक ताफ्यांचा सहभाग असणार आहे. आता डीजेच्या जमान्यात या वाद्याची मागणी कमी झाल्याने संबळवादक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या वाद्याची पुन्हा एकदा नव्याने ओळख व्हावी व वादक कलाकारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा या हेतूने संबळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवात भाग घेणार्‍या सहभागी कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल. तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ तीन क्रमांकांना रोख बक्षिसाने व स्मृतिचिन्हाने गौरवण्यात येईल. कार्यक्रमाचा विनामूल्य आस्वाद घ्यावा, असे संस्थेतर्फे अशोक मोरे, रियाज सय्यद आणि यशवंतराव पानपाटील यांनी कळवले आहे

Related Stories

No stories found.