जागतिक दिव्यांगदिनी रॅलीचे आयोजन

दिव्यांग शाळेतील विदयार्थी घेणार सहभाग
जागतिक दिव्यांगदिनी रॅलीचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त (World Disability Day) जिल्हा परिषद (zilha parishad) समाजकल्याण विभागाच्यावतीने (Department of Social Welfare) शनिवारी (दि.३) सकाळी ७.४५ वाजता शारदा विदयामंदिर राजीवनगर येथून रॅलीला (rally) सुरवात होणार आहे.

सकाळी ९ वाजता मोदकेश्वर गणपती मंदिर, इंदिरानगर येथे या रॅलीचा समारोप होईल. नाशिक शहरातील (nashik city) सर्व दिव्यांग शाळांमधील दिव्यांग विदयार्थी (Disabled students) (चालता येऊ शकणारी, अथवा व्हिल चेअरवरचा वापर करणारी) व शिक्षक (teachers), शिक्षकेतर कर्मचारी हे या रॅलीत सहभागी होणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रॅलीसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन (Organization of cultural events) देखील करण्यात आले आहे. त्याचबरोबर दिव्यांग दिन व समता पर्व निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण, पॅरा ऑलंपिक २०२२ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतील (Paralympic 2022 National Swimming Championships विद्यार्थ्यांचा (students) देखील सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाकल्याण अधिकारी योगेश पाटील (District Welfare Officer Yogesh Patil) यांनी दिली.

दिव्यांग अधिनियम २०१६ बाबत आज कार्यशाळा

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद (zilha parishda) समाजकल्याण विभागाच्यावतीने कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारी(दि.२) दुपारी २ वाजता दिव्यांग अधिनियम २०१६ त्याचबरोबर दिव्यांगासाठी असणारे इतर कायदे यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा होणार आहे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापक व यशदा, पुणे येथील व्याख्याते नंदकुमार फुले हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com