कांदा परिषदेचे आयोजन

दरेकर, खोत, पडळकरांची उपस्थिती
कांदा परिषदेचे आयोजन
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सध्या राज्यातील कांदा उत्पादक ( Onion Growers ) शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला खूप कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या मुद्यावरुन रयतक्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेत निफाड तालुक्यात रविवार दि.5 जूनला निफाड तालुक्यातील ( Niphad Taluka ) रुई गावात (Rui village) कांदा परिषद (Onion Council)घेण्यात येणार आहे.

शासकीय विश्रामगृहात आज (दि.2) आयोजित पत्रकार परिषदेत संघटना प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी ही माहिती दिली. राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कांदा परिषद होणार आहे.

संघटनेच्या ‘जागर शेतकर्‍याचा, आक्रोश कांदा उत्पादकांचा’ या अभियानाअंतर्गत आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे पगार यांनी सांगितले. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार गोपीचंद पडळकर आदी नेते कांदा परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

रुई येथे 1982 मध्ये शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वात कांदा परिषद झाली होती. त्यानंतर सटाणा येथे 2013 मध्ये दुसरी व आता रुई येथे तिसरी राज्यस्तरीय कांदा परिषद होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विशाल पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com