एकदिवसीय सरपंच परिषदेचे आयोजन

एकदिवसीय सरपंच परिषदेचे आयोजन
देशदूत न्यूज अपडेट

सटाणा । प्रतिनिधी Satana

येथील आश्रय फाऊंडेशन व ग्रामसंघ Aashray Foundation & Gramsangh या संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दि. 2 ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय एकदिवसीय सरपंच परिषद sarpanch conference आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वैभव गांगुर्डे व नंदकिशोर शेवाळे यांनी दिली.

या सरपंच परिषदेचे उदघाटन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. दिलीप बोरसे, तसेच स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून खा.सुभाष भामरे, माजी आ. दीपिका चव्हाण, जि.प. सदस्य यतीन पगार, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्यासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सरपंच परिषदेत ग्रामविकासावर दोन सत्रात विचार मंथन होणार असून सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत पहिल्या सत्रात माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख- ग्रामविकास व प्रशासन या विषयावर विचार मांडतील तर दुपार सत्रात पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील हे सक्षम लोकप्रतिनिधी - सर्वांगीण विकास याविषयावर आपले मत मांडणार आहेत.

तसेच आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील हे ग्रामविकासात सरपंच यांची भूमिका या विषयावर विचार व्यक्त करतील, यावेळी बागलाण तालुक्यातील अकरा गावांना संस्थेच्या वतीने उत्कृष्ट ग्रामसंसद पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सरपंच परिषदेत तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन मिळणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

Related Stories

No stories found.