नाशकात लोकअदालतीचे आयोजन

नाशकात लोकअदालतीचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई (Maharashtra State Legal Services Authority, Mumbai )यांच्या आदेशानुसार, नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत जिल्हा व तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने येत्या 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे (Lok Adalat )आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी, मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद, भूसंपादन, एनआय कायदा कलम 138, बँक, वित्तीय संस्था व इतर न्यायालयांत प्रलंबित असलेली प्रकरणे व बँक, वित्तीय संस्था शासकीय आस्थापना यांच्या थकीत रक्कम वसुलीची दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

यामध्ये मिटलेल्या प्रकरणांना अपील नसल्याने वादाला पूर्णविराम मिळतो. वाद तडजोडीने मिटल्यामुळे दोन्ही पक्षांचा विजय होतो. प्रकरणाचा त्वरित निपटारा होतो. लोकन्यायालयात निकाली निघणार्‍या प्रकरणांत कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. तडजोड झाल्यास वादास कायमस्वरूपी पूर्णविराम मिळून वेळ व पैशाची बचत होते, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे (District and Sessions Judge Abhay Waghavase ) यांनी सांगितले.

न्यायालयात प्रलंबित प्रकरणांसह वित्तीय संस्था , शासकीय आस्थापना, टेलिकॉम कंपनी, सहकारी संस्था यांनी जास्तीत जास्त दाखलपूर्व प्रकरणे 25 सप्टेंबर 2021 च्या लोकअदालतीत ठेवून तसेच सामंजस्याने तडजोड करून सक्रिय सहभाग नोंदवावा आणि या संबंधित असणार्‍या सर्वांनी करोना निर्बंधांचे पालन करून या लोकअदालतीचा वाद मिटविण्यासाठी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्र.प्र. कुलकर्णी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. नितीन ठाकरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com