नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालकट्टा व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनात बाल कवी संमेलन कथाकथन, बाल लेखकाशी संवाद असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

या बाल मेळाव्याचे उदघाटन प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर करणार आहेत. बाल वाचकांमधून बाल लेखक घडावेत असा प्रयत्न करण्यात येणार आहे. बालकवी कट्ट्यासाठी व कथा कथनासाठी बाल साहित्यकांनी balkattansk94@gmail.com या मेल आयडीवरच स्वरचित कविता व कथा दि. २८ फेब्रुवारी पर्यंत नावे मोबाईल नंबर व पत्त्यासह पाठवावी.

या संमेलनात ज्या ज्या बाल कवींची व कथाकारंची निवड होईल त्यांना संमेलनात कविता व कथा सादर करण्याची संधी मिळेल, असे आवाहन स्वागताध्यक्ष ना. छगन भुजबळ, कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, कार्यवाह संजय करंजकर, डॉ. शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, भगवान हिरे यांनी दिली.