टपाल विभागातर्फे डाक अदालतीचे आयोजन

टपाल विभागातर्फे डाक अदालतीचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक टपाल विभागात ( Nashik - postal Department) ग्राहकांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी 15 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता डाक अदालतीचे ( Dak- Adalat )आयोजन करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने ग्राहकांनी आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 10 सप्टेंबर पुर्वी डाक अदालत वरिष्ठ अधक्षक, नाशिक डाक विभाग यांच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन नाशिक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांंनी केले आहे.

इच्छुक ग्राहकांनी पोस्टल सेवेविषयी तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आवश्यक आहे. या डाक अदालतीचे आयोजन वरिष्ठ अधीक्षक, नाशिक डाक विभाग, नाशिक मुख्य डाक घर जवळ, त्र्यंबकरोड येथे करण्यात आले आहे.

या डाक आदलतीत पंजीकृत टपाल, स्पीड पोस्ट, बचत बँक, मनी ऑर्डर इत्यादींबाबत तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नाशिक विभागातील पोस्टल सेवेविषयी असनाऱ्या ज्या तक्रारींचे 6 आठवड्याच्या आत निवारण झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींचीही दखल घेतली जाणार आहे, असे प्रवर डाक अधिक्षक मोहीन अहीरराव यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com