मुक्त विद्यापीठात दीक्षांत सोहळ्याचे आयोजन

पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार
मुक्त विद्यापीठात दीक्षांत सोहळ्याचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 27 वा दीक्षांत समारंभ (Convocation Ceremony ) मंगळवार दि. 17 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठ आवारात होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari )असून, त्यांची या सोहळ्याला ऑनलाईन उपस्थिती लाभणार आहे.

तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant )उपस्थित राहणार असून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा एएफसी इंडियाचे अध्यक्ष प्रा. चारुदत्त मायी स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे यावर्षी एकूण एक लाख 76 हजार 113 विद्यार्थी पदवी प्राप्त करीत असून, नोंदणी केलेले स्नातक या सोहळ्याला उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा यंदाचा 27 वा दीक्षांत समारंभ आहे. मागील दोन वर्ष करोनामुळे प्रत्यक्ष दीक्षांत सोहळा होवू शकला नाही. मागील वर्षी विद्यापीठाने नवतंत्रज्ञानाचा वापर करत व्हर्चुअल रियालिटी पद्धतीने दीक्षांत समारंभ आयोजित केला होता.

विद्यापीठातील आठ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि एक हजार 874 अभ्यासकेंद्रे यांच्यामार्फत विद्यापीठातर्फे राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य केले जाते. यंदा विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी पाच लाख 50 हजाराहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत.

पीएच. डी. , एम. फील, पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या जवळपास 138 शिक्षणक्रम एक लाख 76 हजार 113 विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठ प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे.

दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने व वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व परीक्षा नियंत्रक भटू प्रसाद पाटील यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.