
जुने नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक शहर ( Nashik City ) परिसरातील शेकडो भाविक पवित्र हज यात्रेसाठी ( Hajj Yatra ) रवाना होणार आहे. मागील दोन वर्षांपासून करोनामुळे ( Corona ) पवित्र हज यात्रा पूर्ण क्षमतेने झाली नव्हती. मात्र आता परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे पवित्र यात्रा सुरू झाली आहे.
पवित्र हज यात्रेला जाणार्या भाविकांसाठी तनवीर खान (तांबोळी) यांच्या वतीने मोफत हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आज (दि. 23) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यान करण्यात आले आहे.
यावेळी दावते इस्लामी या आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रचारक मुबल्लीग हाजी रफीक (मालेगांव) हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे, तसेच यावेळी नियाज (अन्नदान) चे देखील आयोजन करण्यात आले आहे. जे भाविक पवित्र हज यात्रेला जात आहे किंवा जाणार आहेत त्यांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन खान यांनी केले आहे.