
सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचे Sheth B. N. Sarda Vidayalaya उदार देणगीदार वै. बस्तीरामजी नारायणदास सारडायांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त Late. Bastiramji Narayandas Sarda 57th Death Anniversary रविवारी (दि.19) सकाळी 9 वाजता नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलातील सर्व शाळा व ‘देशदूत’ Deshdoot यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे Blood Donation Camp आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडित, प्राचार्य दीपक जाधव यांनी दिली.
शेठ ब. ना. सारडा विद्यालयात आयोजित या रक्तदान शिबिरात रोटरी क्लब ऑफ सिन्नर, रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर, साईकृपा सोशल फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, लघुउद्योग भारती, वनप्रस्थ, सिन्नर तालुका पुरोहित संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, माहेश्वरी सुरभी मंडळ, माहेश्वरी युवक मंडळ, माहेश्वरी समाज, ढग्या डोंगर ट्रॅकर ग्रुप, नाईकवाडी फार्मसी कॉलेज या संस्थांसह शाळेचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
वै. सारडा यांच्या पुण्यतिथीदिनी गेल्या पाच वर्षांपासून सारडा विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. जनकल्याण रक्तपेढीच्या सहाय्याने हे शिबिर पार पडणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात रक्ताचा तुटवडा भासत असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. करोनाच्या रुग्णांना थेट रक्त पुरवण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे. शहरासह तालुक्यातील रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन पंडित, प्राचार्य जाधव यांनी केले आहे.