भव्य शाही 'तुलसी विवाह' सोहळ्याचे आयोजन

 भव्य शाही 'तुलसी विवाह' सोहळ्याचे आयोजन

चिंचखेड | तुषार झेंडफळे Chinchkhed

दिंडोरी तालुक्यातील( Dindori Taluka ) चिंचखेड ( Chinchkhed )येथील बहुचर्चित शाही तुलशी विवाह सोहळा ( Shahi Tulsi Marriage ceremony) शनिवारी (दि.5) रोजी गोरज मुहूर्तावर संत लाल बाबा यांच्या आशीर्वादाने व ब्रह्ममूर्ती पुरुषोत्तम महाराज यांच्या प्रेरणेने दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे साजरा करण्याचे नियोजन ग्रामस्थांनी केले आहे.

वर चि. श्री गोपीकृष्ण व वधू सौ. का. तुलसी यांचा हळदीचा कार्यक्रम आज शुक्रवार दि.4 रोजी विवाह ठिकाणी होणार आहे. त्यानंतर विवाहाच्या दिवशी दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत संबळ वाद्यावर संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत ह भ प भागवताचार्य अक्रूर महाराज साखरे यांचे जाहीर कीर्तन देखील होणार आहे. किर्तन संपल्यानंतर शाही थाटात भव्य तुलसी विवाह सोहळा या ठिकाणी साजरा होणार आहे.

हा भव्य तुलसी विवाह सोहळा पार पडल्यानंतर तब्बल अर्धा तास निरनिराळ्या फटाक्यांची आतषबाजी सुरू असते. वेगवेगळ्या प्रकारचे फटाके या तुळशी विवाह उपस्थितत्यांना बघायला मिळतात. या भव्य तुलसी विवाह सोहळ्याची जबाबदारी चिंचखेड येथील तरुण युवकांवर सोपवण्यात आली आहे.

या तुलसी विवाह सोहळ्याच्या लग्न पत्रिका देखील छापण्यात आलेल्या आहे.तुलशी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. या शाही तुळशी विवाह सोहळ्याला दरवर्षी जिल्ह्याच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असतात, यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात या तुळशी विवाहाला उपस्थित राहावे असे आवाहन समस्त चिंचखेड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com