गांधीनगरला रामलीला उत्सवाचे आयोजन

गांधीनगरला रामलीला उत्सवाचे आयोजन

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

गांधीनगर ( Gandhinagar ) येथील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात रामलीला समितीची ( Ramlila) बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन यावर्षी अमाप उत्साहात रामलीला हिंदी नाटिका सादर करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पदाधिकार्‍यांनी केले.

भारत सरकार मुद्रणालय, गांधीनगर प्रेसचे प्रभारी व्यवस्थापक बी.के. सहाना, राष्ट्रीय प्रेस कामगार युनियनचे महासचिव रवि आवरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. मागील दोन वर्षांपासून करोनामुळे निर्बंध असल्याने रामलीलेत खंड पडला होता. परंतु यावर्षी निर्बंध शिथिल झाल्याने रामलीला उत्सव मोठ्या धुमधडाक्यात सादर करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. गांधीनगर येथील रामलीलेचे यंदा 67 वे वर्ष आहे.

येत्या 28 सप्टेंबरपासून गांधीनगर येथील क्लब मैदानावर रामलीला आयोजित केली जाणार आहे. रामलीलामध्ये परिसरातील आबालवृद्ध विना मानधन तत्वावर भूमिका सादर करतात. रामलीला समितीचे महासचिव कपिल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्दर्शक हरीश परदेशी, संजय लोळगे,

प्रदीप भुजबळ, दिलबागराय त्रिखा, अनिल गायकवाड, सुनिल मोदियानी, सुनिल साधवानी हे नाटिकेतील सर्व प्रसंग, विविध वेशभूषा, कलावंत, संगीतकार, नैपथ्य यांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बैठकीस अशोक लोळगे, महेश खैरनार, ज्ञानेश्वर कुंडारिया, रमाकांत वाघमारे, अनिल गायकवाड, कैलास वैशंपायन, अर्जुन चौहान, रोहित परदेशी, भरत राव, साहेबराव ढवळे, हरिष जोहरे आदींसह कलावंत उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com