पोलीस आयुक्तालयातर्फे राष्ट्रभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

पोलीस आयुक्तालयातर्फे राष्ट्रभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे (Nashik Police Commissionerate) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( swatantryacha amrut mahotsav )या जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी महाकवी कालिदास कला मंदिर येथे राष्ट्रभक्तीपर गीत गायनाच्या ( patriotic songs)सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती कायम राहोत व स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान स्मरणात राहो याकरिता "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव" या उपक्रमांतर्गत नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे २५ जुलै ते 14 ऑगस्ट या कालावधीत शहर पोलीस फिटनेस मुव्हमेंट ७५ किलोमीटर अंतर चालून अथवा धावून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यक्रमाचा शुभारंभ 25 जुलै रोजी करण्यात येऊन 31 जुलै व ६ ऑगस्ट असे तीन टप्पे पूर्ण करण्यात आले.

त्यानंतर सदरहू राष्ट्रभक्तीपर अमृत गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सादरीकरण पंचम क्रिएशन पुणे यांच्या चमूद्वारे करण्यात आले त्यासोबतच नाशिक शहर पोलीस बँड व आर्टिलरी सेंटर नाशिक येथील आर्मी बँड यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमानंतर पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी सर्व कलाकारांची तसेच प्रमुख पाहुण्यांचे ओळख करून त्यांचा सत्कार केला यावेळी 75 किलोमीटर दौडचे उद्दिष्ट पूर्ण करणारे प्रथम दहा पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यात उपयुक्त संजय बारकुंड यांचे सह नऊ अंमलदारांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार सिमा हिरे, आ. देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य जिल्हा न्यायाधीश व जिल्हा सत्र न्यायालय नाशिक श्रीचंद जगमलानी, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मेजर जनरल एस क्यू अहमद, ब्रिगेडियर ए राजेश डी, ब्रिगेडियर संजय वढेरा, विंग कमांडर गणेश कंन्नन, कर्नल अभिनव सक्सेना, कर्नल चंद्रन, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त हरीश बैजल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.

यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त गुन्हे संजय बारकुंड, उपायुक्त अमोल तांबे, उपायुक्त विजय खरात, उपायुक्त मुख्यालय पौर्णिमा चौगुले आदींसह सर्व सहाय्यक आयुक्त, शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com