अभावितर्फे ‘आंतरराज्य छात्र जीवन दर्शन’ उपक्रमाचे आयोजन

अभावितर्फे ‘आंतरराज्य छात्र जीवन दर्शन’ उपक्रमाचे आयोजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अभाविपची राष्ट्रीय एकात्मता यात्रा (National Integration Journey) दि. 11 फेब्रुवारी रोजी नाशिक (Nashik) शहरात दाखल होणार असून,

यात पूर्वांचलमधील 180 विद्यार्थी (students) उत्तर महाराष्ट्राची सामाजिक अनुभूती घेण्यासाठी अभाविच्या ‘आंतरराज्य छात्र जीवन दर्शन’ (Interstate student life vision) या उपक्रमात होणार सहभागी होणार आहेत.

त्यातील 30 जणाचा एक ग्रुप नाशिकच्या चार दिवसांच्या भेटीसाठी 11 फेब्रुवारीला दाखल होणार असल्याचे स्वागत समिती अध्यक्ष हेमंत राठी (Committee Chairman Hemant Rathi) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आंतरराज्य छात्र जीवन दर्शन प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेचा भाव जागृत करण्याच्या्र उद्देशाने काम करणारा हा अभाविपचा एक बहुउद्देशिय उपक्रम आहे.

ईशान्य भारतातील तरुण आणि इतर राज्यांमधील बंधुत्वाची भावना वाढवण्याच्या उद्देशाने अंतरराज्य छात्र जीवनदर्शन यात्रेची सुरूवात झाली. याच मालिकेत 30 जणांची एक टीम नाशिकच्या अभ्यास दौर्‍यावर येत आहे. यावर्षीची आंतरराज्य छात्र जीवन दर्शन यात्रा (सील) हि आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात (nashik district) प्रथमच येत आहे, तरी हि नाशिककरांसाठी आनंदाची बाब आहे.

या यात्रेत पूर्वांचला मधील विविध राज्यातून अनेक विद्यार्थी सहभागी होत असल्यामुळे चार दिवसीय सील यात्रेसाठी अभाविप कार्यकर्त्यांची जय्यत तयारी सुरू आहे. या पाहुण्याच्या निवासासाठी नागरीकांच्या घरांची निवड करर्‍यात आली असून त्यामाध्यमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन त्यांना होणार आहे. या उपक्रमासाठी सुमारे 30 ते 40 अभावीपच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आंतरराज्य छात्र जीवनदर्शन यात्रेच्या स्वागत समितीमध्ये प्रामुख्याने संरक्षक भारती पवार, संरक्षक राहुल ढिकले, संरक्षक विजय कदम, अध्यक्ष हेमंत राठी, उपाध्यक्ष योगेश थत्ते, सचिव संजय किर्तने, सहसचिव अमित डमाळे, सहसचिव उमेश पगार, सहसचिव स्नेहल साखरे, सदस्य पदावरआदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, डॉ.श्रीया कुलकर्णी, उद्योजक विवेक गोगटे, हेमराज राजपूत, अ‍ॅड.अजय निकम, प्रताप जाधव, नामदेव आढाव,क्रेडाई अध्यक्ष रवी महाजन, तुषार पगार, राजाराम सांगळे, प्राचार्य प्रशांत पाटील, मिलिंद कुलकर्णी, प्रा.राजेश खताळे, प्रदीप वाघ, ओम मालुंजकर यांची निवड करण्यात आली असल्याचे हेमंत रठी यांनी जाहीर केले.

या तीन दिवसांत या विद्यार्थ्यांना नाशिक मधिल आर्टीलरी सेंटर, काळाराम मंदिर, गंगा घाट, सह्याद्री फॉर्म, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, भोसला, संदिप फाऊंडेशन, के.के.वाघ, केटीएचएम या महाविद्यालयांना भेट देणार आहेत. अशा विविध पर्यटन स्थळांना भेट दिली जाणार आहे. महाविद्यालय परिसर पाहता यावा यासाठी महाविद्यालय प्रवास भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच आदिवासी विकास मुख्यालयात मनपा आयुक्त, जी.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याशी वार्तालाप आयोजन करण्यात आले आहे. आर्टलरी सेंटर येथे कॉफी विथ आर्मीचे ही आयोजन करण्यात आले आहे. दि.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाकवी कालिदास कलामंदिरात नागरी सन्मानासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महानगर मंत्री ओम मालुंजकर यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com