मविप्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन

मविप्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मविप्र (MVP) समाजाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (Industrial Training Institute) नाशिक व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी (Mahindra & Mahindra Company) सातपूर यांच्या संयुक्त विद्यमाने

दि.३ जानेवारी २०२३ रोजी औ.प्र.संस्था.नाशिक (nashik) येथे सकाळी ९ ते दु. ५.०० वाजेपर्यंत आय टी आय (ITI) उत्तीर्ण झालेल्या सर्व ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे (Job fair) आयोजन केलेले असून

दहावी किंवा १२ नंतर आय टी आय (ITI) पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (students) अॅप्रेन्टी शिप झालेल्या विद्यार्थ्यांसाठी EPP अंतर्गत नोकरीसाठी होत असून २०० जागांसाठी होणाऱ्या मेळाव्यात विद्यार्थ्यांना वेतनासह इतर सुविधाही मिळणार आहे.

सदर मेळाव्यात वेतनासह इतर सुविधाही मिळणार असून मेळाव्यात मविप्र समाज संस्थेतील सर्व आय टी आय व जिल्ह्यातील सर्व शासकीय व अशासकीय आय टी आय पास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आणि मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे व कार्यकारी मंडळाने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com