सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पर्यावरण पूरक श्री गणेश आरास सजावट स्पर्धेचे आयोजन

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पर्यावरण पूरक श्री गणेश आरास सजावट स्पर्धेचे आयोजन

नाशिक | Nashik

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (Central Hindu Military Education Society) नाशिकच्या वतीने पर्यावरण पूरक श्री गणेश आरास सजावट (Ganesh Idol Decoration Compition) स्पर्धेचे संस्थेच्या प्रत्येक शाळेमध्ये आयोजन करण्यात आले. शाळांमधून उत्कृष्ट सजावटींचे उत्तम देखावे एकत्रित करून विद्या प्रबोधिनी प्रशाळेच्या प्रांगणामध्ये प्रदर्शन भरवण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी आणि श्री गणेश उत्सवामध्ये सुद्धा पर्यावरणाचे रक्षण संवर्धन याचे संस्कार बालमनावरती घडावे या हेतूने संस्थेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमामध्ये संस्थेच्या १६ विभागांच्या २६ संघांनी सहभाग घेतला.

पर्यावरण पूरक सजावट प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सहसचिव आनंद देशपांडे यांच्या हस्ते आणि नाशिक शहरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सकाळी ११ वाजता पासून ते सायंकाळी सहा पर्यंत हे प्रदर्शन नाशिक शहरातील नागरिक विद्यार्थी तसेच पर्यावरण प्रेमी यांच्यासाठी खुले ठेवण्यात आले होते.

या प्रदर्शनाला सुप्रसिद्ध सिने अभिनेते योगेश सोमन यांची विशेष भेट व विद्यार्थ्यांसोबत संवाद झाला. संपूर्ण दिवसभर नाशिक शहरातील शेकडो नागरिक विद्यार्थी पालक यांनी सदिच्छा भेट दिली..

प्रदर्शनामध्ये निसर्गरम्य देखावे, वाचनालयात वाचन करण्यात मग्न असलेले श्री गणपती बाप्पा, मेडिटेशन करत असलेले ध्यानस्थ गणपती बाप्पा, चंद्रयान मोहीम, वसुधैव कुटुम्बकम, भारतातील पर्यटन, वसुंधरा संरक्षण, जल संरक्षण,रस्ते वाहतूक सुरक्षा आदी विविध विषयांवर अत्यंत सजीव देखावे प्रदर्शित सामाजिक संदेशावर भर देण्यात आला होता . स्पर्धेचे परीक्षण रत्ना भार्गवे आणि सुहास जोशी यांनी केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com