रक्तदान शिबिराचे आयोजन
नाशिक

रक्तदान शिबिराचे आयोजन

फा फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिबिराचे आयोजन

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर |प्रतिनिधी Satpur

शिफा सोशल फाऊंडेशन ,नाशिक च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त काल कार्बन नाका शिवाजी नगर या ठिकाणी सामाजिक कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यात होमिओपॅथिक औषध आर्सेनिक अल्बम A30 चे मोफत वाटप , इ.१० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा शुभारंभ नगरसेवक दिनकर पाटील, युवा ऊर्जा फाऊंडेशनचे अध्यक्षअमोल पाटील, सातपूर पोलीस ठाण्याचे वपोनि राकेश हांडे, गंगापूर पोलीस ठाण्याचे व पो.नि. आंचल मुदगल, डॉ. काशिफ शेख (एम.डी. होमी), हाजी फारुख शेख उपस्थित होते.

तसेच शिफा फाऊंडेशनचे अध्यक्ष लियाकत शेख , पापामिया शेख (उपाध्यक्ष), समीर शेख (सरचिटणीस), वसीम सैय्यद (उपसरचिटणीस) ,हाफिज दानिश शेख,जावेद शेख,शकील बागवान, मुकीम अन्सारी, अब्दुल शेख,आवेद शेख,अकील पटेल,जहीर मनियार, अफरोज शेख,अरबाज शेख, शहबाज शेख, आफताब अन्सारी ,शुभम म्हस्के व सदस्यांनी सहभाग घेतला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com