कृषीमाल निर्यात सप्ताहाचे आयोजन

कृषीमाल निर्यात सप्ताहाचे आयोजन

ननाशी। वार्ताहर Nanashi

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या Department of Agriculture, वतीने कृषी माल निर्यात सप्ताहांतर्गत Agricultural Goods Export Week दिंडोरी तालुक्यातील Dindori Taluka तळ्याचापाडा, चाचडगाव, जांबुटके आदी गावात विविध कार्यक्रम राबविण्यात करण्यात आले.

या सप्ताहांतर्गत तळ्याचापाडा येथे भात, टोमॅटो व भाजीपाला पिकांचे सेंद्रिय व निर्यातक्षम उत्पादन, कीड रोग नियंत्रण या विषयी शेतकर्‍यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंतचे डॉ. राकेश सोनवणेउपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी आत्मा संस्था नाशिकचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम होते .

या कार्यशाळेत भात टोमॅटो व इतर भाजीपाला पिकावरील कीड रोग नियंत्रणाबाबत डॉ. राकेश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. सेंद्रिय उत्पादन, कृषिमाल निर्यात, शेतकरी बचत गटांची स्थापना, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, कृषी निविष्ठा खरेदी याविषयी राजेंद्र निकम यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी ई -पीक पाहणी, महाडीबीटी, प्रधानमंत्री कृषी अन्न प्रक्रिया उद्योग नागली उत्पादन याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमास माजी पं. स. सदस्य गोपिनाथ गांगोडे, पं. स. सदस्य एकनाथ गायकवाड, सरपंच देविदास गांगुर्डे, गांडोळेचे माजी सरपंच सुरेश भोये, ग्रामसेवक अनंत जेट्टे आदीसह शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक संजय सावंत यांनी केले तर मंडळ कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक महेंद्र गवळी, योगेश जोपळे, भाऊसाहेब वाघमोडे यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.