नाशकात ऑटो अ‍ॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पोचे आयोजन

नाशकात ऑटो अ‍ॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पोचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (Nashik District Transport Association )वतीने 'ऑल व्हील डिस्प्ले' संकल्पनेखाली (दि. 17 ते 19 मार्च) तीन दिवसीय ‘ऑटो अ‍ॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पो’( Auto And Logistics Expo) चे ठक्कर डोम येथे आयोजन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यामध्ये ऑटो आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सर्व घटक एका छताखाली येणार आहेत. या एक्स्पोच्या माध्यमातून महामार्गावर दर 150 किलोमीटरवर चालकांसाठी विश्रांतीगृह, हेल्थ चेकअप सेंटरसह ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली.

यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी, उपाध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत, सचिव शंकर धनावडे, सल्लागार जे. पी. जाधव, सुनील बुरड, एम. पी. मित्तल, कृपाशंकर सिंह, हरनारायण अग्रवाल, बजरंग शर्मा, दीपक ढिकले, सुनील जांगडा, नीटस् मीडियाचे संचालक नितीन भोसले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना फड यांनी सांगितले की, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून नाशकात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर ऑल व्हील डिस्प्ले या संकल्पनेखाली भव्य ऑटो अ‍ॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी दळणवळण क्षेत्राशी निगडीत सर्व घटक एकाच छताखाली आणण्यासोबत वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या चालकांसाठी विश्रांतीगृह, हेल्थ चेकअप सेंटरसह ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. या तीन दिवसीय एक्स्पोमध्ये ट्रान्स्पोर्टची सुरुवात असलेल्या सायकलपासून ते ट्रेलरपर्यंत सर्व छोट्या-मोठ्या वाहनांचा समावेश असणार आहे.

शिवाय ऑटो व लॉजिस्टिक्स व्यवसायाशी निगडीत सर्व घटकही एक्स्पोमध्ये सहभाग घेणार आहेत तसेच विविध नामांकित कंपन्या व संस्था त्यांचे या ठिकाणी स्टॉल उभारणार आहेत. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विविध ईव्ही कंपन्यांची उत्पादने विक्रीसाठी येत असून सदर एक्स्पोमध्ये सर्व ईव्ही एकाच छताखाली बघावयास मिळणार असून हा एक्स्पो नाशिककरांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

‘एक देश अनेक व्यंजन’ फूड फेस्टिव्हल

यावेळी देशभरातील नामवंत दिग्गजांसोबतच मोठ्या संख्येने नागरिक भेट देणार आहेत. त्यामुळे एक्स्पोत ‘एक देश अनेक व्यंजन’ या संकल्पनेखाली देशभरातील व्यंजनांचा सहभाग असलेले फूड फेस्टिव्हल मुख्य आकर्षण असणार आहे. तसेच मनोरंजनासाठी देशभरातील विविध राज्यांच्या वेशभूषांचा फॅशन शो भरवण्यात येणार आहे. हा फूड फेस्टिव्हल व सर्व सांस्कृतिक कार्यक्रम भारत भारती या संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे.

या संघटनांचा सहभाग

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य ट्रक-टेम्पो-टँकर्स-बस वाहतूक महासंघ, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशन, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट, साऊथ इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून एक्स्पोसाठी नाशिक फर्स्ट, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, सिनर इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, नाशिक मोटर मर्चंट असोसिएशन, नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना, श्रमिक सेना-टॅक्सी-रिक्षा-ट्रक संघटना, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन, नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशन, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मोटर वाहन विभाग, अधिकारी संघटना आरटीओ, भारत रस्ता सुरक्षा, भारत भारती, नाशिक डिस्ट्रिक्ट क्रेन ओनर असोसिएशन, लघु उद्योग भारती नाशिक यासह विविध संघटनांचे सहकार्य आहे. एक्स्पोचे नियोजन नीटस् मीडियाच्या वतीने करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com