
सप्तशृंगी गड | वार्ताहर | Saptashrungi Gad
महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी गड (Saptashrungi Gad) हे सह्याद्री पर्वत रांगेत डोंगर पठारावर असल्याने या ठिकाणी वर्षभरात लाखो भाविक वर्षभरात हजेरी लावतात....
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेने भाविकांच्या सेवा-सुविधा दिवसेंदिवस अधिक सुलभ होण्याकरिता प्रयत्न करीत आहे. वर्षभरातील चैत्र व नवरात्र उत्सव पौर्णिमा त्याच बरोबर मंगळवार, शुक्रवार व रविवारआदी दिवशी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी असते.
गर्दीचे नियोजन व नियंत्रण होण्यासाठी अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने प्रति व्यक्ती १०० रुपयेप्रमाणे श्री सप्तशृंगी मातेचे सशुल्क दर्शन सुविधा सोमवारपासून (दि. १३) कार्यान्वित करण्यात येणार आहे.
ही सुविधा भाविकांसाठी ऐच्छिक असून भाविकांना सर्वसामान्य दर्शन व्यवस्था आहे तशी उपलब्ध असेल. ऐच्छिक सशुल्क व्ही. आय. पी. दर्शन सुविधेचा लाभ घेणाऱ्या १० वर्षाच्या आतील वयोगटातील भाविकांना पास निशुल्क असेल.
सशुल्क व्ही. आप. पी. दर्शन पास हे विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात, उपकार्यालयात सकाळी ९.०० ते ६.०० वाजे दरम्यान भाविकांना उपलब्ध होणार आहे. सशुल्क व्हीआयपी दर्शन पासच्या माध्यमातून भाविकांना जलद भगवती दर्शन सुविधेची संधी उपलब्ध होणार आहे. सप्तशृंगी गडावरील स्थानिक ग्रामस्थांना आधारकार्ड तपासून मोफत दर्शन सुविधा देणार असल्याची माहिती माहिती विश्वस्त संस्थेमार्फत देण्यात येत आहे.