
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मराठा विद्या प्रसारक समाजाचे (Maratha Vidya Prasarak Samaj) कर्मवीर अॅड.बाबुराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक सिव्हील इंजिनिअरिंग विभाग व नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन (Nashik District Transport Association) यांच्या संयुक्त विद्यमाने
‘ऑल व्हील डिस्प्ले ऑटो अॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पोच्या (All Wheel Display Auto & Logistics Expo) पार्श्वभूमीवर‘ नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यटन विकासाचा (Transport Management and Tourism Development) सर्वांगीण दृष्टीकोन’ या विषयावर उपाययोजना स्पर्धेचे (दि.११ मार्च) मविप्रच्या (MVP) इंजिनिअरिंग विभागात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे (Adv.Nitin Thackeray General Secretary of MVP), केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.देवने, सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ.पी.डी.नेमाडे व नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी (students) नाशिक शहरातील द्वारका सर्कल, मुंबई नाका सर्कल, पाथर्डी फाटा सर्कल, राणे नगर सर्कल, अंबड लिंक रोड, सिटी सेंटर मॉल चौक, सातपूर अंबड लिंक रोड, बळी मंदिर चौक, दिंडोरी नाका, काट्या मारुती चौक, सिन्नर फाटा, सिंबायोसिस कॉलेज सर्कल या चौकांचा अभ्यास करून याठिकाणी वाहतूक सुरळीत होण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या जाऊ शकता
तसेच नाशिक मधील पर्यटन विकासाबाबत (Tourism development) वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे, मंदिरे, किल्ले, वाईनरी, हॉटेल, फार्म, धरणे, वने यांचा कसा विकास केला जाऊ शकतो याबाबत सविस्तर पॉवर पॉईट प्रेझेंटेशन (Power point presentation) आणि एवन साईज पोस्टर सादर करावे. उपाययोजना सुचवत असतांना यामध्ये नाशिकचे ऐतिहासिक, समाजिक, सांस्कृतिक, पर्यटन, कृषि, वाईन उत्पादन या बाबींचा विचार करण्यात येणे अपेक्षित आहे.
नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यटन विकासाचा सर्वांगीण दृष्टीकोन’ या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये इंजिनिअरींग, अॅग्रीकल्चर, पॉलीटेक्निक, आर्किटेक्ट, मॅनेजमेंटसह विविध विषयात शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.