मुक्त विद्यापीठात क्रीडा स्पर्धांचे आयोजन

मुक्त विद्यापीठात क्रीडा स्पर्धांचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या( YCMOU) मैदानावर सोमवार दि. 21 नोव्हेंबरपासून विद्यापीठाची दोन दिवसीय केंद्रीय क्रीडा स्पर्धा(sports competition) आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे (International runner Monica Athray) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांनी दिली.

मंगळवार दि.22 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता या क्रीडा स्पर्धेचा समारोप कार्यक्रम कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाशिकसह, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे या आठही विभागीय केंद्रातून जवळपास साडेचारशे खेळाडू सहभागी होत आहेत.

यातील विजेत्या खेळाडू विद्यार्थ्यांची दि.3 ते 7 डिसेंबर दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणार्‍या विद्यापीठस्तरीय राज्य क्रीडास्पर्धेसाठी निवड होणार आहे. केंद्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, अ‍ॅथलेटिक्स खेळांचा समावेश आहे. क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यार्थी कल्याण केंद्राच्या प्रमुख प्रा.विजया पाटील यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com