श्रीराम कथा व तुलसी विवाह कार्यक्रमाचे आयोजन

श्रीराम कथा व तुलसी विवाह कार्यक्रमाचे आयोजन

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

लोकनेता प्रतिष्ठान, व श्रीक्षेत्र संत शक्तिधाम देवस्थान यांच्यावतीने राजे संभाजी स्टेडियम (Raje Sambhaji Stadium) येथे श्री राम कथा (Shri Ram Katha) व तुलसी विवाह (Tulsi Vivah) कार्यक्रमाचे आयोजन एक नोव्हेंबर पासून करण्यात आले आहे. यावेळी राम कथा व तुलसी विवाह हा कार्यक्रम आठ दिवस चालणार आहे

तुलसी विवाह निमित्ताने होणाऱ्या श्रीराम कथेचे ध्वजारोहण (flag hoisting), कथामंडप भूमिपूजन व पत्रिका प्रकाशन सोहळा आमदार सीमा हिरे (MLA Seema Hirey), माजी नगरसेविका कावेरी घुगे, माजी नगरसेवक दिनकर पाटील (Dinkar Patil), शिवाजी चुंबळे, तानाजी जायभावे यांच्या हस्ते राजे संभाजी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता (दि. १ नोव्हेंबर ते दि. ८नोहेंबर) कालखंडामध्ये पूज्य श्री भावविश्वरत्न रामायणाचार्य ह भ प समाधानजी महाराज शर्मा यांची श्रीराम कथा होणार आहे. या कथेचे आयोजन नियोजन भव्य दिव्य स्वरूपाचे आहे.

नाशिककर (nashik) व उत्तर महाराष्ट्रासाठी ही एक प्रकारची अध्यात्मिक मेजवानी आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून (maharashtra) विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. सामाजिक शैक्षणिक (Social Education), सांस्कृतिक, कला- क्रीडा, राजकीय, अध्यात्मिक क्षेत्रातील विशेष मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन गेल्या एक महिन्यापासून चालू आहे. या सोहळ्याच्या आयोजन माजी नगरसेविका कावेरी घुगे व लोकनेता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोविंद घुगे यांनी केले आहे. ०१ नोव्हेंबर रोजी समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे सायंकाळी ८ते रात्री १० या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे.

त्याचप्रमाणे श्रीराम कथा सांगता प्रसंगी काल्याचे किर्तन महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan), कीर्तन केसरी, वारकरी रत्न , ह भ प संजय नाना महाराज धोंडगे यांचे होणार आहे याप्रसंगी विश्वास नागरे, माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, कैलास चुंबळे, बुधाजी पानसरे, राधेय मालपाणी, मदन डेमसे, ह भ प सोपान महाराज रावळगावकर, ह भ प मेघशाम महाराज निकम व परिसरातील नागरिक वारकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व आभार कार्यक्रमाचे आयोजक लोकनेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद घुगे यांनी मांनले. सूत्रसंचालन ह भ प राहुल महाराज साळुंके यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com