नाशकात बालरोगतज्ज्ञ परिषदेचे आयोजन

नवजात शिशू आरोग्यावर तीन दिवस मंथन
नाशकात बालरोगतज्ज्ञ परिषदेचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स शाखा नाशिक (Indian Academy of Paediatrics Branch Nashik) आणि महाराष्ट्र स्टेट ब्रँच ऑफ इंडियन ऍकडमी ऑफ पेडियाट्रिक्स (Maharashtra State Branch of Indian Academy of Paediatrics)यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय बालरोग तज्ज्ञ परिषद आयोजित करण्यात आली आहे. दि.18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान हॉटेल गेटवे ताज येथे ही परिषद होत आहे. यानिमित्त बालरोग आणि नवजात शिशुंच्या आरोग्यासंबंधी सर्वच पैलूंवर मंथन होणार आहे.

‘महापेडीकॉन-2022’ची ही 32 वी परिषद आहे. ‘लेटस् व्हेज दी मॅजिक व्यूईथ दी लॅजिक’या संकल्पेनवर यंदाची परिषद होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील व सचिव डॉ. मिलिंद भराडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लहान मुलांचे आजार बदलत चालले आहेत. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण लसीकरणांमुळे कमी प्रमाणात होत आहे. आता मुलांमध्ये स्थूलपणा, डायबिटीस, एकाकीपणा वाढताना दिसत आहेत. या विषयावर परषदेत मंथन होणार आहे. ग्रामीण भागातील डॉक्टरांना कमीत कमी खर्चात रूग्णांना उत्तम उपचारपध्दती कशी देता येईल याबद्दलही मार्गदर्शन केले जाणार आहे, असे डॉ. भराडिया यांनी सांगितले.

परिषदे अंतर्गत वेगवेगळ्या विषयांवर 44 व्याख्याने, गटचर्चा, परिसंवादाचे आयोजन केले आहे. राज्यातील व देशातील 200 वक्ते मार्गदर्शन करतील. 8 कार्यशाळा होणार असून यापैकी 6 कार्यशाळा मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय येथे होतील. दोन कार्यशाळा अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे डॉ. सुशील पारख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहेत, असे डॉ. रमाकांत पाटील, डॉ. रवी सोनवणे यांनी सांगितले. यावेळी डॉ.पुरुषोत्तम देवी तसेच डॉ. श्याम चौधरी यांच्या संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमांबद्दल माहिती देण्यात आली.

परिषदेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मृदुला फडके व डॉ. राजलक्ष्मी नायर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिसेफच्या कार्यशाळा होणार आहेत. 18 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता डॉ. उपेंद्र किंजवडेकर, डॉ. हेमंत गंगोलिया, डॉ. अमोल पवार, डॉ. रमेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. परिषदेचा समारोप 20 नोव्हेंबरला ‘लव्ह यू जिंदगी’ या सांस्कृतिक गीत संगीत नृत्याच्या कार्यक्रमाने होणार आहे.

1,500 डॉक्टरांचा सहभाग

परिषदेत महाराष्ट्रातून 1,500 हून अधिक डॉक्टर्स सहभागी होत आहेत. डॉ. सुशील पारख, डॉ. प्रफुल्ल पटेल, डॉ. अनिरूध्द भांडारकर, डॉ. प्रशांत कुटे, डॉ. पंकज गाजरे, डॉ. सागर सोनवणे, डॉ. रवी सोनवणे, डॉ. संगीता लोढा डॉ. नितीन मेहेकर, डॉ. नितीन सुराणा, डॉ. सदाचार उंजळमरकर, डॉ. प्रकल्प पाटील परिश्रम घेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com