
नाशिक । प्रतिनिधी Nashik
अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखेने बालरोगतज्ञांसाठी ‘नाशिकॉन 2023’ राज्यस्तरीय परिषद आयोजित केली आहे. येत्या 10 व 11 जूनला त्र्यंबकरोडवरील हॉटेल ग्रेप काउंटी रिसॉर्ट येथे होत असलेल्या या परिषदेत राज्यभरातून 400 हून अधिक बालरोग तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
बालरोग तज्ज्ञ संघटनेचे नाशिक शाखा अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर, ‘नाशिकॉन’चे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ज्ञ संघटनेचे समन्वयक डॉ.मिलिंद भराडिया यांनी परिषदेबाबत माहिती दिली.
परिषदेचे उद्घाटन मुंबईतील लीलावती आणि हिंदूजा हॉस्पटलच्या बालरोगतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. उमा अली यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर, महाराष्ट्र राज्य बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, सचिव डॉ. अमोल पवार, कॉलेज ऑफ फिजिशियन अॅण्ड सर्जन, मुंबई येथील अध्यक्ष डॉ. गिरीष मैदणकर यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे आयोजन समिती अध्यक्ष डॉ. नितीन सुराणा यांनी सांगितले.
परिषदेनिमित्त नोंदणीतून संकलित होणार्या निधीतून 1.25 लाख रुपये आदिवासी भागातील 5 एकल विद्यालय दत्तक घेऊन त्यांसाठी खर्च केले जाणार आहेत. तेथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचा विनिमय केला जाईल, असे डॉ.अनिरुद्ध भांडारकर यांनी सांगितले.
बालकांच्या आजारांचे बदलते स्वरूप, उपचारातील आधुनिक पद्धतींची माहिती बालरोग तज्ज्ञांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या परिषदेचे यंदाचे 6 वे वर्ष आहे. या परिषदेत लहान मुलांमधील गुंतागुंतीचे आजार व त्यावरील उपचार, लसीकरण व उपचारातील आधुनिक पद्धती आदींबाबत सत्रांतून मार्गदर्शन केले जाणार असूल्याचे डॉ मिलींद भराडिया यांनी सांगितले. डॉ. नितीन सुराणा, डॉ. सुलभा पवार, डॉ. सचिन पाटील, डॉ. तरुण कानडे, डॉ.वैशाली भराडिया, डॉ.शलाखा बागुल, डॉ. सुलभा पवार यांनी ‘नाशिकॉन’ आयोजनाबद्दलची भूमिका मांडली.
परिषदेच्या यशस्वितेसाठी बालरोग तज्ज्ञ संघटना नाशिक शाखेचे सचिव डॉ. सचिन पाटील, खजिनदार डॉ.प्राची बिरारी, डॉ. पवन देवरे, डॉ. शीतल मोगल, डॉ. प्रकल्प पाटील, डॉ. अमोल मुस्कुटे, डॉ. तृप्ती महात्मे, डॉ.सचिन चौधरी, डॉ.सागर सोनवणे, डॉ. रवि सोनवणे, डॉ.सदाचार उजळणकर, डॉ. सागर सोनवणे, डॉ. नितीन मेहकटकर, डॉ. अमित पाटील, डॉ. शीतल जाधव, डॉ. सुनीता दराडे, डॉ. कविश मेहता यांच्यासह संघटनेचे सदस्य परिश्रम घेत आहेत.