शिवसेनेच्या वतीने महा आरोग्य महोत्सवाचे आयोजन

शिवसेनेच्या वतीने महा आरोग्य महोत्सवाचे आयोजन

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण गामणे- दराडे (Former corporator Kiran Gamane-Darade)यांच्या वतीने २६ नोहेंबर ते २ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान सिंहस्थ नगर येथील बाळासाहेब ठाकरे दवाखाना येथे महा आरोग्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी व तत्काळ उपचार करण्यात येणार आहेत.यावेळी डोळ्यांची तपासणी व तात्काळशस्त्रक्रिया,रक्तचाचणी,स्त्रीरोग,बालरोग,दंतरोग,हृदयरोग,मणके विकार आदी विकारांचा तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत उपचार करण्यात येणार असून या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्यासंख्येने लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका किरण गामणे दराडे , बाळा दराडे,शाखाप्रमुख आनंद घुगे,शाखाप्रमुख विक्रांत सांगळे,अध्यक्ष दीपक गामने,राजेंद्र गामने यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com