नाशकात 'खान्देश महोत्सवाचे' आयोजन

नाशकात 'खान्देश महोत्सवाचे' आयोजन

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

खान्देशची कृषी संस्कृती (Agricultural Culture of Khandesh), खाद्य संस्कृती (Food culture), वेगळी आहे. येथे प्राचीन परंपरा आहे. या भागातील अनेक दिग्गजांनी साहित्य, कला, शैक्षणिक, संशोधन, समाजकारण यांसारख्या विविध क्षेत्रात आपले अनमोल योगदान दिले आहे.

म्हणून या विभागाला अधोरेखित करून त्याठिकाणची संस्कृती, कला, साहित्य, खाद्यपदार्थ याबरोबरच येथील माणसांनी जपलेले सांस्कृतिक वैभवास व्यासपीठ मिळवून देण्यासाठी चार दिवसांच्या ( दि.२२ डिसेंबर ते २५ डिसेंबर) सिटी सेंटर मॉल (City Center Mall) जवळील ठक्कर डोम (Thacker Dome) येथे "खान्देश महोत्सवाचे" (Khandesh Festival) आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक पश्चिमच्या आमदार सिमा हिरे (MLA Seema Hirey) व संयोजिका रश्मी हिरे बेंडाळे यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली.

यावेळी बोलतांना आमदार हिरे यांनी सांगितले कि, महाराष्ट्रातील अन्य भागांच्या तुलनेने खान्देशची सांस्कृतिक, सामाजिक, अशी स्वतंत्र ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील (nashik district) काही भागांसह जळगाव (jalgaon), धुळे (dhule) आणि नंदुरबार (nandurbar) हे तीन जिल्हे खान्देश म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक संपन्न करणाऱ्या खान्देशातील स्थानिक कला, संस्कृती, परंपरा आणि प्रतिभा यांना प्रोत्साहित करण्यासाठी एक निश्चित व्यासपीठ उपलब्ध करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

या महोत्सव माध्यमातून आपल्याला खान्देशची अद्वितीय परंपरा आणि संस्कृती जवळून अनुभवता येणार आहे. मराठी बोलीभाषेतील एक प्रमुख भाषा असलेल्या अहिराणी बोलीतील लोकसाहित्य, खान्देश समृद्ध इतिहासाचा साहित्यिक वारसा, लोप पावत चाललेल्या खान्देश लोकसंस्कृतीचा प्रचार प्रसार, खान्देशमधील प्रतिभावंतांच्या सहभागाने सक्रिय व्यासपीठाची निर्मिती, खान्देशमधील खाद्य संस्कृती, परंपरा, साहीत्य यांची मांडणी,

खान्देशातील प्रेक्षणीय स्थळांच्या पर्यटन वृद्धीसाठी विशेष उपक्रम, खान्देश संस्कृती संबंधित सर्व घटकांचा सहभाग, खान्देशमधील उद्योजकांना उत्पादित मालाच्या विक्रीसाठी नवीन पर्याय उपलब्ध, आर्थिक आणि सामाजिक महिला सक्षमीकरण, महिलांसाठी व्यवसाय क्षेत्रात जनजागृती, व्यावसायिक कौशल्ये आणि स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न, महिलांसाठी बाजारपेठेची उभारणी आणि नेटवर्किंगसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. या महोत्सवातून आपल्या समोर उलगडला जाणार आहे.

यावेळी (दि. 22 डिसेंबर) नवीन नाशिक परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत पारंपारिक नृत्य, कानबाई उत्सव, गोंधळी नृत्य, लेझीम पथक, डोंगर देव, तसेच खान्देश संस्कृतीचे दर्शन घडविणा-या प्रतिकृती, विविध वेशभूषा केलेले शालेय विद्यार्थी, पारंपारिक वाद्यच्या गजरात ही शोभायात्रा निघणार तसेच महोत्सवामध्ये विविध शासकीय विभाग, शासकीय कार्यालये, निमशासकीय विभाग यांचे कृषी, पर्यटन, पुरातत्व विभाग आदि माहितीपर स्टॉल्स, खान्देश प्रदेशाला एक विशिष्ट ऐतिहासिक वारसा लाभला आहे

खान्देश मधील किल्ले, लेण्या, ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक ठिकाण पर्यटन स्थळे याबाबतची सविस्तर माहिती या प्रदर्शनातून देण्यात येणार आहे. तसेच लोक कला ,होम मिनिस्टर असे सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम होणार आहे तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील अनेक उद्योजक सामाजिक कार्यकर्ता..चांगले सरकारी अधिकारी..क्रीडापटू..अशा विविध स्तरातील गुणवंतांचा खान्देश रत्न पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. .

कार्यक्रमाची रूपरेषा

  • गुरुवार २२ डिसेंबर

  • सकाळी 8 वाजता “खान्देशनी शोभायात्रा”

  • उद्घाटन समारंभ

  • अहिराणी साहित्य व कवी संमेलन

शुक्रवार २३ डिसेंबर

  • सकाळी : महिलासाठी भजन स्पर्धा

  • संध्याकाळी : न्यू होम मिनिस्टर चला पैठणी जिंकूया व फॅशन शो

  • शनिवार २४ डिसेंबर

  • सकाळी : टॅलेंट शो व डान्स कॉम्पिटिशन

  • संध्याकाळी : सांस्कृतिक कार्यक्रम

  • लोककला व लावणी महोत्सव

रविवार २५ डिसेंबर

  • संध्याकाळी : सुप्रसिद्ध गायक यांची शानदार मैफिल व तसेच

  • “खान्देश रत्न पुरस्कार वितरण सोहळा”

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com