जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा संपन्न

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा संपन्न

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शासकीय अनुदानित (Government subsidy), विनाअनुदानित व कायमस्वरूपी विनाअनुदानित (Unaided) दिव्यांगांच्या (disabled) विशेष शाळा शाळांमधील (school) दिव्यांग विद्यार्थी (Disabled students) व प्रशिक्षणार्थी यांच्यातील क्रीडा कलागुणांना वाव मिळावा व त्यांना खेळात सहभाग घेण्याची संधी मिळावी,

या उद्देशाने दरवर्षी दिव्यांग मुला मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा (State level sports competition) आयोजन समाजकल्याण विभागाच्यावतीने (Department of Social Welfare) करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा स्पर्धांमधून खेळाडू हे राज्य स्तरावर सहभाग घेत असतात. नाशिक जिल्हा परिषद (nashik zilha parishad) समाजकल्याण विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Chief Executive Officer Ashima Mittal) यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांग विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन सेंट झेवियर्स हायस्कूल, नाशिकरोड (nashik road) येथे करण्यात आले होते.

'खेळांच्या जगात आम्ही सुद्धा' असं दर्शवत २७ शाळांतील ८२५ स्पर्धेत सहभाग नोंदवला. विकलांगांसाठी क्रीडा स्पर्धा नियम आणि मार्गदर्शन यामध्ये दिलेल्या सूचनेनुसार या स्पर्धा घेण्यात आल्या, या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांची (students) निवड ही जानेवारी २०३३ मध्ये बालेवाडी पुणे (pune) येथे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार आहे. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थी हे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे (Zilha Parishad Additional Chief Executive Officer Dr Arjun Gunde) यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करत हिरवा झेंडा दाखवून स्पर्धांना सुरवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांसमोर संचलन केले. नॅब शाळेतील विद्यार्थिनींनी खेळ प्रतिज्ञा घेतली. क्रीडा स्पर्धेत अंध, मतिमंद, अस्थिव्यंग, कर्णबधिर व बहु विकलांग प्रवर्गातील वय वर्ष ८ ते २५ वर्षाखाली मुले मुली यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धांमध्ये ५० मीटर १०० मीटर २०० मीटर व ५०० मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, स्पोर्ट जंप, बुद्धिबळ 50 मीटर पोहणे इत्यादी प्रकारचे खेळ घेण्यात आले.

उद्घाटनाप्रसंगी झेवियर्स हायस्कूल प्राचार्य फादर डायस लोबो, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे विवेक आंबेकर, सचिव परेश महाजन, भावेश पटेल, राजेंद्र धारणकर, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते.प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले. समाज कल्याण विभागाचे अधिकारी विजय पाटील यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com