लिलावासाठी वाजत-गाजत आणला सेंद्रिय कांदा

सेंद्रिय पद्धतीच्या उन्हाळ कांद्यास मिळाला 4200 रुपये क्विंटल भाव
लिलावासाठी वाजत-गाजत आणला सेंद्रिय कांदा

पिंपळगाव बसवंत । वार्ताहर Pimpalgaon Basvant

सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या उन्हाळ कांद्याला (organic Onion) पिंपळगाव बाजार समितीत 4 हजार 200 रुपये क्विंटल दर मिळाला. बाजार समितीत कांद्याला या वर्षी मिळालेला हा उच्चांकी दर मिळाला.

निफाड तालुक्यातील सुकेणे येथील कांदा उत्पादक शामराव सीताराम मोगल( Shyamrao Sitaram Mogal ) यांनी केमिकल, औषधांचा वापर न करता कांद्याचे पिक सेंद्रिय खतांचा वापर करून घेतले. हा कांदा रसायणमुक्त असल्याने त्यांनी थेट बैलगाडीत सजावट करून वाजंत-गाजत बाजार समितीत विक्रीस आणला होता.

सेंद्रिय पद्धतीने कांदा पिकवल्याबद्दल बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर व मान्यवरांच्या उपस्थित शेतकरी मोगल यांचा सत्कार केला.त्यांनतर बाजार समितीच्या कार्यालयाजवळ लिलाव प्रक्रिया पार पडली. व्यापार्‍यांनी हा कांदा खरेदीसाठी लिलावात चढाओढ दर्शविल्याचे बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com