शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या दलालांचे परवाने रद्द करण्याचे आदेश

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या दलालांचे परवाने रद्द करण्याचे आदेश
कृषी उत्पन्न बाजार समिती

पंचवटी | Panchavti

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Krushi Utpanna Bajar Samiti) मुख्य बाजार आवारात दररोज भल्या पहाटे भाजीपाल्याचे ओझे घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास दिला जातो. या गुंडप्रवृत्तीच्या दलालांवर कारवाई करण्याबाबत शिलापूर ग्रामपंचायत (Shilapur Accident) व सोसायटीवतीने बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे (President Devidas Pingale) यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल सभापती देविदास पिंगळे यांनी घेतली आहे. अशा स्वरूपाचे चवळी दलाल कार्यरत असल्यास त्यांचे परवाने रद्द करा, वेळ पडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश सभापती पिंगळे यांनी प्रशासनास दिले आहेत.

नाशिक शहराजवळील (Nashik City) भागातून बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात अनेक शेतकरी किरकोळ फळभाज्या व पालेभाज्या विक्रीसाठी पहाटे तीन ते सहा वाजेच्या सुमारास आणत असतात. यावेळी आवारात शेतमाल विकत घेऊन जागेवर विक्री करणारे चवळी दलालही असतात.

यातील काही गुंड प्रवृत्तीच्या चवळी दलालांकडून शेतकऱ्यावर दादागिरी होते व जागेहून वादविवादही होत असतात. यासाठी पहाटेच्या वेळेत भाजीपाला व फळभाज्या विक्री (Sale Of Vegetable) करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तरेकडील साईनाथ हॉटेलसमोरील बाजू उपलब्ध करून द्यावी. वादविवाद व दादागिरी करणाऱ्या चवळी दलालांवर कारवाई व्हावी, अश्या स्वरूपाचे निवेदन बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांना देण्यात आले.

यावेळी शिलापुर ग्रामपंचायत व सोसायटीच्या शिष्ठमंडळासमवेत सभापती पिंगळे यांनी चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. अशा स्वरूपाच्या चवळी दलालांचे परवाने रद्द करा, वेळ आल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सभापती पिंगळे यांनी प्रशासनास दिले.

यावेळी शिलापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेश कहांडळ, भास्कर कहांडळ, वसंत कहांडळ, नारायण कहांडळ, मच्छिद्र मासाळ, शांताराम कहांडळ, किसन कहांडळ, रघू खुर्दळ, रामदास कहांडळ, अरुण कहांडळ, विलास कहांडळ आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com