जिल्हा रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडीट करा

सा. बां. विभागाच्या मुख्य अभियंत्यांचे आदेश
जिल्हा रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडीट करा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक मनपा रुग्णालयात ऑक्सिजन गळतीच्या घटनेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी या खात्याच्या अखत्यारीत येणार्‍या आरोग्य विभागाच्या इमारती आपत्कालीन परिस्थितीमध्ये सक्षम राहतील, याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

संबंधित उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी दक्ष राहणे गरजेचे, असून आज. दि. 23 रोजी एकूण इमारतनिहाय अहवाल नाशिक विभागातील अधिक्षक अभियंत्यांनी मुख्य अभियंत्यांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सा. बा. खात्याच्या अंतर्गत आरोग्य खात्याची जिल्हा शासकीय रुग्णालये(सिव्हील हॉस्पिटल), संदर्भ सेवा रुग्णायले, उपजिल्हा रुग्णालये व दवाखाने आहेत. त्यांची तत्काळ पाहणी करावी. पाहणी करतेवेळी विद्युत विभागाचे अधिकारी हजर राहतील याची काळजी घ्यावी.

पाहणीमध्ये अग्निशमन यंत्रणा, ऑक्सिजन पाईप लाईन, टँक, जलनि:सारण, एसी, विद्युत उपकरणे, पाणी इतर अनुषंगिक बाबी 100 टक्के क्षमतेने कार्यरत आहेत की नाहीत, पुरवठा याची पाहणी करून त्रुटी असतील तर त्रुटींची पूर्तता करून सर्व इमारती अद्ययावत राहतील याची दक्षता घ्यावी, असे सांगितले आहे.

या संदर्भातला अहवाल मुख्य अभियंता हे बांधकाम विभागाच्या सचिवांना सादर करणार आहे. त्यानुसार इमारतनिहाय अहवाल शुक्रवार दि. 23 रोजी दु. 12.00 पर्यंत मुख्य अभियंता कार्यालयास सादर करावा. नाशिक महानगरपालिकेसारखी दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. याबाबत ढिलाई आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता पी. बी. भोसले यांनी सा. बा. मंडळातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगरचे कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, अधिक्षक अभियंत्यांना पत्रात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com