नित्कृष्ठ रस्ता प्रकरणी फेरदुरुस्तीचे आदेश

ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल
नित्कृष्ठ रस्ता प्रकरणी फेरदुरुस्तीचे आदेश

शिरवाडे वाकद । वार्ताहर Shirwade Wakad-Niphad

वाकद ते वाकद फाटा या रस्त्याचे काम (Road work) घाईघाईत उरकल्याने सदरचे काम अतिशय नित्कृष्ठ झाले आहे. परिणामी हे काम करणार्‍या ठेकेदाराविरुद्ध (Contractor) ग्रामपंचायत (grampanchayat) व ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर बांधकाम विभागाने (Construction Department) याची दखल घेत संबंधित ठेकेदारास हे काम परत दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वाकद फाटा ते वाकद 0/00 ते 1/500 या रस्त्याचे सध्या नूतनीकरण (Renewal) चालू आहे.

मात्र या रस्त्यावर अत्यंत नित्कृष्ठ दर्जाची खडी व मातीमिश्रित मुरूम वापरून सदरचे काम घाईघाईत पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा (Contractor) प्रयत्न होता. याबाबत येथील नागरिक अशोक वाळूंज यांनी संबंधित ठेकेदारास या नित्कृष्ठ कामकाजाबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित ठेकेदाराने त्याकडे हेतूपुरस्कर कानाडोळा करीत काम सुरू ठेवले.

त्यामुळे अशोक वाळूंज, ग्रामपालिका सरपंच नलिनी गांगुर्डे यांनी जि.प. (इ.व.द) उपविभाग, उपअभियंता ढिकले (Deputy Engineer Dhikale) यांच्याकडे लेखी तक्रार केली. परिणामी त्यांनी या अर्जाची दखल घेऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली असता त्यांना हे काम दरसुचीच्या माणकाप्रमाणे तसेच सूचनांचे पालन न करता नित्कृष्ठ दर्जाचे आढळून आले.

त्यामुळे त्यांनी सप्तश्रृंगी कन्स्ट्रक्शन (Saptashrungi Construction), विजय बाळासाहेब पाटील, कर्मयोगी नगर, सिटी सेंटर मॉल, गोविंदनगर लिंक रोड, नाशिक (nashik) यांना लेखी आदेश काढून माणकाप्रमाणे तसेच निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा सदरच्या कामाचे देयक रोखण्यात येईल असा इशारा दिला.

येवला (yeola), लासलगाव (lasalgaon) मतदार संघात (Constituency) पालकमंत्री (Guardian Minister) ना.भुजबळ (Bhujbal) यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. मात्र अधिकारी व ठेकेदार यांची साखळी निर्माण झाल्याने बहुतांशी कामे माणकाप्रमाणे होत नाही असे आढळून आले आहे.

नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. देखरेख अभियंता कानाडोळा करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी येवूनही दोन चार वर्षात रस्त्याची वाट लागते. त्यामुळे मतदार संघातील नित्कृष्ठ कामांवर ना.भुजबळ यांचा वचक असावा अशी मागणी नागरिक करत आहेत जेणेकरून निधीचा खर्‍या अर्थाने विनियोग होईल. ग्रामस्थांनी देखील रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com