नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; दिवसभरात २७३ मिलीमीटर पावसाची नोंद

नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; दिवसभरात २७३ मिलीमीटर पावसाची नोंद

नाशिक। प्रतिनिधी Nashik

दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. आज शहरात तुरळक सरी बरसल्या असल्या तरी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकाच दिवसांत २७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने नाशिकला ऑरेंट अलर्ट जाहीर केला असून अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा इशारा दिला आहे....

ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणाही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज झाल्या आहेत.

पहाटेपासून सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. पीक वाढीसाठीही पोषक वातावरण तयार झाले आहे. शहरात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रावर जाणवणार आहे.

त्यामुळे नाशिकलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक जिल्हयात आतापर्यंत ६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी

नाशिक शहर ९ मिलीमीटर

इगतपुरी ३३ मिलीमीटर

दिंडोरी ७ मिलीमीटर

पेठ २१.१ मिलीमीटर

त्र्यंबकेश्वर १८ मिलीमीटर

मालेगाव ४४ मिलीमीटर

नांदगाव ३७ मिलीमीटर

चांदवड ९ मिलीमीटर

कळवण ११ मिलीमीटर

बागलाण १८.४ मिलीमीटर

सुरगाणा ३५.१ मिलीमीटर

देवळा ०.३ मिलीमीटर

निफाड ४.० मिलीमीटर

येवला २६ मिलीमीटर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com