नाशिक जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट'

नाशिक जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्रात सोमवार ते गुरुवारपर्यंत चार दिवस अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. सोमवारी पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' (Red Alert) देण्यात आला आहे...

तर नाशिकसह (Nashik) १४ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' (Orange Alert) देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरासह ओडिशा व आंध्र प्रदेश किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांना एनडीआरएफच्या (NDRF) टीम सज्ज ठेवण्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) दिला आहे.

बंगालच्या उपसागरात रविवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६० कि.मी. वेगाने वाढला आहे. हा कमी दाबाचा पट्टा ओडिशासह आंध्र प्रदेश किनारपट्टीवरही सक्रिय आहे.

त्याचे आगामी ४८ तासांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होत आहे. त्यामुळे सोमवार ते गुरुवारपर्यंत महाराष्ट्रासह अंदमान-निकोबार बेट प. बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, पुद्दुचेरी, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, तेलंगण, मध्य प्रदेशसह १२ राज्यांन अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

एनडीआरएफची टीम सज्ज ठेवण्याची सूचनाही देण्यात आली आहे. या चार दिवसांत या सर्व राज्यांत १५० ते २०० मि.मी. पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com