म्हाडाच्या ना हरकत दाखल्याची जाचक अट रद्द करावी : आ.हिरे

क्रेडाई नाशिक शिष्टमंडळाची गृहनिर्माण विभागाकडे मागणी
म्हाडाच्या ना हरकत दाखल्याची जाचक अट रद्द करावी : आ.हिरे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

म्हाडाच्या ना हरकत दाखला मिळविण्यास उशीर झाल्यास बांधकाम व्यावसायिकांचा प्रकल्प सुरु करण्यास अथवा पूर्ण होण्यास देखील उशीर होतो. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नासोबतच म्हाडाच्या जागांच्या विविध समस्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी आ. सीमा हिरे यांनी क्रेडाई नाशिक मेट्रो शिष्टमंडळासमवेत गृहनिर्माण मंत्री अतुलकुमार सावे यांची भेट घेऊन ही जाचक अट रद्द करण्याची मागणी केली.

मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार तरतूद नसताना देखील म्हाडास बांधकाम केलेले क्षेत्र व खुली जागा हस्तांतरित करताना ना हरकत दाखल्याची मागणी महानगरपालिकेकडून केली जाते. मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमधील इंलूसिव हाऊसिंगच्या तरतुदीनुसार एलआयजी किंवा एमआयजी योजनेमध्ये बांधकाम किंवा ले आउट करताना म्हाडाला 20 टक्के जागा सोडणे अपेक्षित आहे. परंतु म्हाडाकडून ना हरकत दाखला घेण्याची युडीसीपीआरमध्ये कोणतीही तरतूद नाही.

या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या वत्सला नायर, संजिव जयस्वाल, प्रतिभा भदाणे, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर, सहसंचालक हर्षल बाविस्कर, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, म्हाडाच कासार आणि क्रेडाईचे माजी अध्यक्ष जितेंद्र ठक्कर, सुरेश आण्णा पाटील, रवी महाजन व क्रेडाई नाशिक मेट्रो अध्यक्ष कृणाल पाटील उपस्थित होते.

नाशिक मधील म्हाडा विभागातील असलेल्या अडचणी मांडून म्हाडाने मंजूर विकास नियंत्रण नियमावली नुसार नगरपालिकेचा प्लॅन मंजुरी वेळी ना हरकत दाखला घेऊ नये, ही जाचक अट रद्द करावी, अशी ठाम भूमिका क्रेडाई नाशिकने घेतली व नाशिक मधील विकासकांना व जमीन मालकांना असलेल्या अडचणी मंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यांनी त्वरित 10 दिवसांच्या आत समिती गठन करून यावर त्वरित निर्णय घेण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

वास्तविक म्हाडा संस्थेकडून ना हरकत दाखला घेण्याची तरतूद मंजुर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये नाही. तरी देखील म्हाडा संस्थेकडील ना हरकत दाखल्याची मागणी नाशिक महानगरपालिकेकडुन करण्यात येते. अर्जदार जमीन देऊन टी. डी. आर. घेण्याकरिता तयार असतांना देखील अशा प्रकारे ना हरकत दाखल्याकरिता अडवणूक करणे योग्य नाही.

-कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो

.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com