सुरत-चेन्नई महामार्गाला विरोध

सुरत-चेन्नई महामार्गाला विरोध

मध्यस्थीसाठी शेतकर्‍यांचे खा. गोडसेंना साकडे

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Cmap

नाशिक (nashik) तालुक्यातील आडगाव (Adgaon), लाखलगाव, ओढा, विंचूर गवळी येथून जाणार्‍या सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गमुळे (Surat-Chennai Green Field Highway) शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असल्याने याबाबत खा. हेमंत गोडसे (mp hemant godse) यांनी पुढाकार घेऊन शेतकरी (farmers) वर्गास योग्य तो न्याय मिळवून देण्याची मागणी शेतकरी शिष्टमंडळाने केली आहे.

नाशिक तालुक्यातील बागायती भाग म्हणून ओळखले जाणारे आडगाव, लाखलगाव, ओढा, विंचूर गवळी या परिसरातून जाणार्‍या सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग येथील शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. जमिनीचे होणारे मूल्यांकन, मिळणारा मोबदला या बाबी शेतकर्‍यांना न परवडणार्‍या आहेत. त्यामुळे शिष्टमंडळाने खा. हेमंत गोडसे यांची भेट घेऊन चर्चा करताना सांगितले की, सदर भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी व प्रोजेक्ट डायरेक्टर (Collector and Project Director) यांनी बाधित शेतकर्‍यांची बैठक घेऊन सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र शासनाने (maharashtra government) 6 ऑक्टोबर रोजी काढलेला भूसंपादन (Land acquisition) निर्णयबाबत मोबदला कसा देणार आहेत, याची माहिती दिली नाही, याशिवाय 3 ए नोटिफिकेशनमध्ये भारत राजपत्रामध्ये सर्व जमीन शुष्क या जिरायती दाखवण्यात आलेल्या आहेत, वास्तविक हा संपूर्ण परिसर बागायती तसेच व्यावसायिक स्वरूपाचा आहे,

जाणारा महामार्गला लागून सर्विस रोड (Service Road), अंडर पास (Underpass), शेतकर्‍यांना आजूबाजूच्या शेतात जाण्याबाबत रस्त्याची तरतूद राहणार आहे किंवा नाही, त्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही, शिवाय सांडपाणी जाण्याकरता ड्रेनेज व्यवस्था (Drainage system) कशी असेल, हे देखील कोणालाही माहीत नाही. भूसंपादन होणार्‍या अनेक जमिनींमध्ये पोट हिस्सा, आणेवारीप्रमाणे प्रत्यक्षात जागेवर येऊन मोजणी करून द्राक्षेबागा, फळ, झाडे, इमारती, विहिरी, तळे, घर, गोठा, इलेक्ट्रॉनिक कनेक्शन पोल, बोअर, पाईप लाईन, याचा स्वतंत्र खुलासा होणे अपेक्षित आहे.

तसेच नुकसान भरपाई रक्कम शेतकर्‍यांना अदा केल्याशिवाय जमिनी शासनाने कब्जात घेऊ नये, अशी मागणी करताना आडगाव येथील जागृत देवस्थान मनुदेवी मंदिर, पिर मंदिर (धोंडवीर मंदिर) या मंदिराचे भूसंपादन न करता आहे त्या परिस्थितीत विकसित करण्यात यावे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे,

शिवाय रस्त्याचे कामकाज सुरू असताना कॉन्ट्रॅक्टरच्या (Contractor) मशीनरीमुळे आजूबाजूच्या जमिनीतील पिकाचे नुकसान होणार आहे त्याचा मोबदला मिळावा, जमिनीचे दोन किंवा त्या पेक्षा आधिक तुकडे होण्याची शक्यता आहेत, काही तुकड्यांमध्ये 1ते10 गुंठे जमीन शिल्लक राहिल्यास सदर क्षेत्र कसणेसुध्दा अशक्य होईल तेंव्हा क्षेत्र शिल्लक राहिल्यास त्याची नुकसान भरपाई अदा करण्याबाबत भूसंपादन अधिकारी यांना अश्वाशित करणे आवश्यक आहे.

समृद्धी महामार्गाप्रमाणे (Samruddhi Highway) सर्व शेतकर्‍यांना जमिनीचा पाचपट मोबदला देण्यात यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी अ‍ॅड. प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष विनायक कांडेकर, प्रदीप कांडेकर, तानाजी जाधव, प्रभाकर कांडेकर, भरत जाधव, बाजीराव दुशिंग, दीपक कांडेकर, गणेश ढिकले, आण्णा कग, अशोक शिंदे , बहिरू जाधव, वैभव सुर्वे, भाऊसाहेब नाठे, आधीसह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com