वडगाव-पिंगळा येथे रेल्वे भूसंपादनास विरोध

शेतकर्‍यांचा निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा
वडगाव-पिंगळा येथे रेल्वे भूसंपादनास विरोध

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील वडगाव-पिंगळा (Wadgaon-Pingala) येथील शेतकर्‍यांनी (farmers) जमिनीचे मुल्यांकन कमी असल्याने नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाच्या (Nashik-Pune railway project) भुसंपादनास विरोध (Opposition to land acquisition) दर्शवला आहे. शेतकर्‍यांना चिंचोली (chincholi) व नानेगावप्रमाणे दर द्यावा अन्यथा येणार्‍या निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा (Warning of boycotting elections) प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी दिला आहे.

वडगाव-पिंगळा येथे यासाठी नुकतीच ग्रामसभा (gram sabha) आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत सर्वच शेतकर्‍यांनी रेल्वेमार्ग जिल्हा मूल्यांकन समिती (Railway District Assessment Committee) व महारेल कंपनी यांनी घोषित केलेला जमिनीचा दर समाधानकारक नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. इच्छित दर द्या अथवा प्रकल्प रद्द करा असा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला.

येथील शेतजमीन पूर्णपणे बागायती असून सर्व बाधित शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. त्यामुळे बाधित शेतकर्‍यांचे उदरनिर्वाहाचे साधनच संपुष्टात येणार असून ते भूमिहीन व बेरोजगार होणार आहेत. वडगाव पिंगळा व चिंचोली ही दोन्ही गावे नाशिक महानगरपालिका हद्दीपासून 6 ते 7 कि.मी. अंतरावर असून दोन्ही गावे नगरविकास रचना आराखड्यात (Urban development plan) येतात. तसेच गावाच्या शिवारात नाशिक साखर कारखान्याचा (Nashik Sugar Factories) काही भाग येत आहे. प्रस्थापित रिंगरोड दोन्ही गावांतून जात आहे.

गावातून कडवा धरणाचा पाट गेलेला आहे. तथापी, वडगाव पिंगळा येथील जाहीर केलेला शेतजमिनीचा दर हा चिंचोली व नानेगाव या दोन्ही गावांच्या तुलनेत अत्यल्प आहे. चिंचोली शिवारातील जिरायत शेतजमिनीला 1 लाख 61 हजार रुपये प्रतिगुंठा दर जाहीर केला. वडगाव-पिंगळा येथे जिरायत शेतजमिनीचा प्रतिगुंठा दर 71 हजार रुपये आहे. त्यामुळे चिंचोली प्रमाणे दर मिळावा अन्यथा प्रकल्प बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

ठरावाचे वाचन राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अजय हुळहुळे यांनी केले. ठरावावर सूचक म्हणून सोमनाथ गणपत सानप, अनुमोदक म्हणून ज्ञानेश्वर हरळे यांनी सही केली. यावेळी पोलिसपाटील सागर मुठाळ, उपसरपंच ज्ञानेश्वर हरळे, शिवाजी दराडे, रामनाथ हुळहुळे, अंबादास सानप, संपत कासार, तानाजी सानप, ज्ञानेश्वर सानप, भास्कर सानप आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

दडपशाही केल्यास आत्मदहन

प्रशासकीय अधिकारी व महारेल कंपनी यांनी दडपशाही, हुकुमशाही, दहशत मार्गाने जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व बाधित शेतकरी आत्मदहन करतील. तसेच येणार्‍या काळात खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल असा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com