...हे तर वराती मागून घोडे

यांत्रिकी झाडूवरून विरोधी पक्षनेते बोरस्तेंची टीका
...हे तर वराती मागून घोडे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेने ( NMC ) शहर स्वच्छतेच्या नावाखाली स्वच्छत्ता कामगारांचा मोठा ठेका आणला. मात्र ठेका देऊनही शहर स्वछ होत नाही, म्हणून आता यांना यांत्रिकी झाडू आठवलाय, महापौर सतीश कुलकर्णी ( Mayor Satish Kulkarni ) यांनी ज्यादिवशी पदभार स्विकारला तेव्हाच शहर स्वछतेचा विचार करायला हवा होता, आता शहर स्वछतेसाठी यांत्रिकी झाडुची प्रक्रिया राबविणे म्हणजे, वराती माघून घोडे हाकलण्याचा प्रकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते ( NMC Leader Of Opposition Ajay Boraste ) यांनी केली.

शहर बससेवेचे उद्घाटन गुरुवारी माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित झाले. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी शहर स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन यांत्रिक झाडू खरेदीकरण्याबाबत घोषणा केली. यावरुन पालिका क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे. दोन वर्षांपासून पालिका उत्पन्नास करोनाचा मोठा फटका बसला आहे.

ही परिस्थिती पाहून पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सर्वच विभागांच्या निधीत 25 टक्क्यांंची कपात करण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या कामावर टांगती तलवार आल्याचे चित्र आहे. दरम्यान शहरात सध्याच्या घडीला 2500 सफाई कर्मचार्‍यांमार्फत सफाईचे काम केले जात आहे. यात 1800 सेवक कायमस्वरुपी तर 700 जण कंत्राटी पध्दतीने काम करत आहे. पुढच्या काही दिवसातच आणखी 700 सेवक कंत्राटी पध्दतीने भरली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात स्वछतेवर कोट्यावधीचा खर्च केला जातोय, गेल्या वर्षी देशभरातील स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिक अकराव्या स्थानावर होते.

बांधकामाच्या ढिगार्‍याचा फटका बसल्याने नाशिक दहामधून बाहेर गेल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी विकासकांना बांधकामाचे ढिग शहराबाहेर घेऊन जाण्याची तंबी दिली आहे. ढिग शहराबाहेर न नेल्यास बांधकाम व्यावसायिकांना आठ पट दंडाची तंबी दिली. यामुळे नाशिक पहिल्या दहामध्ये सहज येण्याची शक्यता आहे, असे असतानाही यांत्रिकी झाडूवर कोट्यवधीचा खर्च करण्याचा घाट सुरू आहे. सहा विभागात हे यंत्र आणण्याची तयारी सुरु आहे. निवडणुका काही महिन्यांवर आल्या असतानाच आताच यांत्रिकी झाडूची आठवण झाली, असा सवाल उपस्थित होतोय.

सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावरुन जुंपण्याची शक्यता आहे.दरम्यान देशात स्वच्छतेत प्रथम आलेल्या इंदुर शहरात यांत्रिक झाडू कशा पध्दतीने काम करतात, याचा अभ्यास करण्यासाठी पाहणी दौरा आहे, आवश्यक्ता भासल्यास झाडू भाड्याने घेतले जातील, त्यामुळे लगेचच झाडू खरेदी केले जातीलच असे नाही, असेस महापौर यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com