गिरणा नदीतून जाणार्‍या जलवाहिनीला विरोध

गिरणा नदीतून जाणार्‍या जलवाहिनीला  विरोध

कळवण | पुनदखोरे वार्ताहर kalwan

कळवण शहरासाठी Kalwan City आरक्षित झालेल्या पिण्याच्या पाण्याला Reserved Drinking Water आमचा विरोध नाही. परंतु पाणी पाईपलाईनद्वारे pipeline न देता नदी प्रवाहानेच द्यावे अशी मागणी गिरणा बचाव समितीच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदार बी. ए. कापसे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कळवण शहरासाठी आमदार नितीन पवार MLA Nitin Pawar यांच्या माध्यमातून 25 कोटी रुपयांची नळपाणीपुरवठा योजना शासनस्तरावरून मंजूर केली आहे. या योजनेचे लवकरच काम सुरु होणार आहे. या योजनेमुळे तालुक्यातील बार्डे, कळमथे, पाळे, आसोली, मानूर, एकलहरे, कळवण, नाकोडा, जुनीबेज, नवीबेज, भादवन, बगडू, पिळकोस येथील शेती पूर्णतः उद्धवस्त होणार आहे. येथील शेतकरी देशोधडीला लागणार आहे.

या नदीवर पश्चिम भागातील 17 खेडे नदीच्या पाण्यावर अवलंबुन आहेत. येथील सर्वच गाव व पाणीपुरवठा योजना कोरड्या ठाक पडणार आहे. या योजनेमुळे एका गावाला मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून इतर सर्व गावांना तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे.

यावेळी हरी पाटील, प्रभाकर पाटील, भरत शिंदे, मोहन जाधव, भिमराव देवरे, बाळासाहेब गांगुर्डे, नामदेव गांगुर्डे, रामदास देवरे, युवराज पवार, नारायण गांगुर्डे, सचिन पाटील, विक्रम वाघ, सौरभ पाटील, वसंत पाटील, जाधव, निलेश जाधव, सुधाकर जाधव, दीनानाथ शिरसाठ, रविंद्र पाटील, विजय चव्हाण, मधुकर भदाणे, कैलास पाटील आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com